International Crimes Tribunal's Role and Proceedings : बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणींमध्ये मोटी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात मोहम्मद यूनुस सरकारने आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये हसीना यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलन चिरडण्याची त्यांची कृती म्हणजे मानवतेविरोधातील गुन्हा असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शेख हसीना यांच्यावरील आरोप सिध्द झाल्यास त्यांना मृत्यूदंडाचीही शिक्षा होऊ शकते. त्यामुळे बांग्लादेशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात बांग्लादेशात विद्यार्थी आंदोलन चिघळले होते. शेख हसीना सरकारविरोधात या आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाली. हसीना यांना भारतात पळून यावे लागले.
अंतरिम सरकारचे प्रमुख असलेल्या मोहम्मद यूनुस यांनी नंतर हसीना यांच्यासह त्यांच्या अनेक सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. आता आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हसीना यांच्यासह माजी गृह मंत्री असदुज्जमां खान कमाल आणि माजी आयजीपी चौधरी मानून यांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.
सरकारने रविवारी दाखल केलेल्या आरोपपत्रात हसीना यांना मुख्य आरोपी केले आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात देशभरात झालेले सामुहिक हत्याकांडाचा प्रमुख आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी हसीना यांनी आदेश दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लोकांना भडकावणे, षडयंत्र रचणे आदी आरोपांचाही त्यात समावेश आहे.
दरम्यान, ज्या न्यायाधीकरणात यूनुस सरकारने आरोपपत्र दाखल केले आहे, त्याची स्थापना शेख हसीना यांनीच केली आहे. 1971 च्या बांग्लादेश स्वातंत्र्य संग्रामादरम्यान पाकिस्तानी सैन्याने गेलेल्या अत्याचाराच्या चौकशीसाठी त्याची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर आता मागील वर्षीपासून हसीना यांच्यावरही याच न्यायाधीकरणात खटला सुरू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.