India Vs Pakistan : पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद; जुना डाव टाकत भारताला खिंडीत गाठणार?

Pakistan’s Turn as UN Security Council President : काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे. त्यामध्ये इतर कोणताही देश ढवळाढवळ करू शकत नाही, असे भारताकडून अमेरिकेसह संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले आहे.
India–Pakistan War
India–Pakistan Warsarkarnama
Published on
Updated on

Kashmir Agenda on the UNSC Dais : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बुरखा जगासमोर फाडला. पाककडूनच दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचे अनेक पुरावे भारताने यापूर्वीही जगासमोर मांडले आहेत. तर पाक भारतावरच आरोप करत आहे. आता तर पाकला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. दोन्ही देशांमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पाक यामाध्यमातून भारताला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करू शकते.

काश्मीर हा मुद्दा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील आहे. त्यामध्ये इतर कोणताही देश ढवळाढवळ करू शकत नाही, असे भारताकडून अमेरिकेसह संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले आहे. पण आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे जुलै महिन्याचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर काश्मीरचा मुद्दा या व्यासपीठावर उचलून धरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे स्थायी प्रतिनिधी असीम अहमद यांनीच तसे संकेत दिले आहेत. काश्मीर वाद आता आणखी टाळणे योग्य नाही. सुरक्षा परिषदेला यातून तोडगा काढण्यासाठी उपाय करायला हवेत. काश्मीरचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला वादाचा मुद्दा पाकिस्तान आणि भारतादरम्यान गंभीर तणाव निर्माण करत आहे, असे अहमद म्हणाले आहेत.

India–Pakistan War
Mumbai High Court : I Love You म्हणणे म्हणजे..! मुंबई हायकोर्टाची महत्वपूर्ण टिप्पणी, 10 वर्षांपूर्वीची केस निकाली

सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद मिळणे, हा सध्याच्या स्थितीत पाकिस्तानसाठी मोठी संधी असल्याचे मानले जात आहे. दर महिन्याला अध्यक्षपद बदलत असते. पाकला जुलै महिन्यासाठी हे पद मिळाले आहे. सध्या पाक सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. ही संधी मिळताच पाकने पुन्हा काश्मीरचा मुद्दा तापवण्यास सुरूवात केली आहे.

India–Pakistan War
अतिरिक्त पोलिस आयुक्त सरकारला भिडले अन् जिंकलेही; कोण आहेत हे IPS अधिकारी?

दरम्यान, पाकिस्तानकडून यापूर्वीही यूएनसमोर हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे. त्यामुळे आताही त्यात फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. पाकिस्तानला सुरक्षा परिषदेत आपल्याला हवा तसा प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी किमान नऊ सदस्य राष्ट्रांचा पाठिंबा आवश्यक आहे. मात्र, सद्यस्थिती तसे होऊ शकत नाही. अमेरिकेसह अन्य काही देशांचा भारताला पाठिंबा आहे. तसेच भारतानेही पाकिस्तानकडूनच दहशतवादाला समर्थन दिले जात असल्याचे जगासमोर मांडले आहे. त्यामुळे पाकच्या हाती फारसे काही लागणार नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com