Lok Sabha Election 2024 : पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी 'गुगल'नं बनवलं खास 'डुडल'

Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting : भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. विशेष म्हणजे गुगलच्या होमपेजवर दिसणारा लोगो बदलण्यात आला आहे.
Google Doogle
Google Doogle Sarkarnama

Lok Sabha Election 2024 Phase 5 : लोकसभा निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील आज देशभरात मतदान होत आहे. सध्या देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. आज देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे पाचव्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात लाखोंच्या संख्येत मतदार सहभागी होत आहेत.

भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. विशेष म्हणजे गुगलच्या होमपेजवर दिसणारा लोगो बदलण्यात आला आहे. यासाठी खास 'गुगल'ने आपल्या खास डूडलद्वारे लोकशाहीचा हा सण साजरा केला आहे. या लोगोमध्ये, उभ्या असलेल्या तर्जनीला शाई असलेले चित्र तयार केले आहे. या डूडलवर क्लिक करून, यूजर्स भारतातील 18 व्या सार्वत्रिक निवडणुकांची ताजी माहिती मिळवू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Google Doogle
Maharashtra Politics News: ...म्हणून 5 टप्प्यांत निवडणुका घेणं भाजपच्याच अंगलट; भास्कर जाधवांचा आकडेवारी सांगत मोठा खुलासा

लोकसभा निवडणुकीचा टप्पा 5:

भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) सात टप्प्यांपैकी पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांमध्ये मतदान होणार असल्याची माहिती आहे. यात एकूण 49 मतदारसंघांतून 695 उमेदवार रिंगणात आहेत, 89.5 दशलक्षाहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत. ज्यात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाचव्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, लडाख यांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीर यांचा समावेश आहे. Lok Sabha Election 2024 Google made a special doodle for the fifth phase of voting

आघाडीचे उमेदवार कोण आहेत?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे, महायुतीचे पीयूष गोयल, डॉ भारती पवार, वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ), महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत, महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच देशात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती ते काँग्रेस नेते राहुल गांधी, लोजप (रामविलास) नेते चिराग पासवान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य या प्रमुख उमेदवार आमने - सामने आले आहे.

Google Doogle
Lok Sabha Election Voting Updates : सहा तासानंतर महाराष्ट्रात निरुत्साह; 30 टक्केही मतदान नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com