BJP MLA news : वडिलांनी 3 बूट फेकून मारले तर आमदार झालो, 5 मारले असते तर..! भाजप आमदाराने सांगितली आपबीती...

Bhairaram Siyol statement : आई-वडील मुलांना संस्कार देतात, त्यांचे पालनपोषण करतात, असे सांगत भैराराम सियोल म्हणाले, आजकाल काही मुलं किंवा जोडपी आपल्या आई-वडिलांच्या विरोधात निर्णय घेतात.
BJP News
BJP News Sarkarnama
Published on
Updated on

BJP MLA viral remark : ‘छडी लागे छमछम, विद्या येई घमघम’... या गीताप्रमाणे विद्यार्थीदशेत असताना पूर्वी बहुतेकांना असा अनुभव आला असेल. अभ्यास अन् शिस्तीसाठी शिक्षकांनी उगारलेल्या छडीने अनेकांचे भविष्य घडले. भाजपच्या एका आमदाराने शिस्तीबाबत आपल्याला आलेला अनुभव सांगताना थेट वडिलांनी फेकून मारलेल्या बुटांची आठवण काढली.

राजस्थानातील भाजपचे आमदार भैराराम सियोल यांनी जोधपूरमधील एक कार्यक्रमात बोलताना आपला अनुभव सांगितला. मुलांवरील संस्कार आणि शिस्तीवर बोलताना भैराराम म्हणाले, ‘माझ्या वडिलांनी मला रागात तीन बूट मारले, त्यानंतर मी आमदार झालो. त्यांनी जर मला पाच बूट मारले असते तर मी खासदार झालो असतो.’   

सियोल यांच्या या विधानावर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. आई-वडिलांचा सन्मान करण्याचा संदेश युवकांना देताना त्यांनी हे विधान केले. आई-वडिलांचा सन्मान करा, त्यांचे मार्गदर्शन घ्या. शिस्त आणि संस्कार हीच खरी यशाची गुरूकिल्ली आहे. वडिलांनी लावलेली शिस्त नेहमीच मुलांच्या भविष्याचा आधार बनते, असे सियोल यांनी सांगितले.

BJP News
Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

आई-वडील मुलांना संस्कार देतात, त्यांचे पालनपोषण करतात, असे सांगत सियोल म्हणाले, आजकाल काही मुलं किंवा जोडपी आपल्या आई-वडिलांच्या विरोधात निर्णय घेतात. विवाहित मला आपल्या पतीला सोडून पळून जातात. मुलांना बुटाने मारले तर मलेरियासारख्या गोळ्यांचे काम करतात, अशा कडक शब्दांत सियोल यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

BJP News
Dilip Walse Patil post : जशी 68 वर्षे जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती..! वळसे पाटलांच्या ‘फियाट’ पोस्टची जोरदार चर्चा

दरम्यान, सियोल यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. सियोल यांनी यापूर्वीही अनेकदा अशीच विधाने करत लक्ष वेधून घेतले होते. आता त्यांनी युवकांना मार्गदर्शन करताना स्वत:चे उदाहरण आगळेवेगळे उदाहरण देत लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या व्हिडीओला सोशल मीडियातही पसंती मिळत आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com