Dilip Walse Patil post : जशी 68 वर्षे जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती..! वळसे पाटलांच्या ‘फियाट’ पोस्टची जोरदार चर्चा

Maharashtra political discussion : सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं, असे दिलीप वळसे पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
Dilip Walse Patil post on X
Dilip Walse Patil post on XSarkarnama
Published on
Updated on

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी अलीकडेच आपल्या वय आणि राजकीय प्रवासाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी पाटील यांनी भर कार्यक्रमात आपली खंत बोलून दाखवली होती. काय झालं ते माझं मलाच कळलं नाही. म्हणजे जास्त नाही, पण माझं राज्यात थोडं वजन कमी झालं", असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

आता वळसे पाटील यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एका जुन्या फियाट गाडीचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्याखाली कॅप्शन मध्ये राजकारण्यांना सल्ला देणारी गोष्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये दिलीप वळसे पाटील यांनी फियाटचा संबंध थेट अधिक वय असलेल्या व्यक्तींशी जोडला आहे.

वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, काल मुंबईतील जिमखान्यात व्यायामासाठी गेलो असताना चालता चालता उभ्या असलेल्या एका जुन्या Fiat गाडीवर माझं लक्ष गेलं. बारकाईने पाहिलं असता कळलं की ती गाडी 1958 साली बनवलेली आहे… आणि आजही, तब्बल 68 वर्षांनंतर, ती अत्यंत उत्तम स्थितीत सेवेत आहे!

Dilip Walse Patil post on X
Jagdeep Dhankhar news : जगदीप धनखड यांनी चक्रं फिरवली अन् भाजपचा पराभव? तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजकीय समीकरणं बदलली...

एखादी गोष्ट योग्य प्रकारे जपली, व्यवस्थित मेंटेन ठेवली, तर ती कित्येक वर्ष उत्तम चालू राहू शकते, याचं हे जिवंत उदाहरण आहे. त्या गाडीच्या मालकाने केलेली जपणूक आणि काळजी खरंच प्रेरणादायी आहे. असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे हाच विचार राजकारण आणि समाजकारणालाही लागू होतो, असेही म्हटले आहे.

जसं 68 वर्षं जुनी गाडी आजही सक्षमपणे चालू राहू शकते, तसंच एखादी व्यक्ती जर आपल्या विचारांची, मूल्यांची आणि कामाची जपणूक करत राहिली, तर वय काहीही असो, ती व्यक्ती तितक्याच जोमाने, आत्मीयतेने आणि ताकदीने समाजासाठी काम करत राहू शकते. कारण सातत्य, शिस्त आणि जपलेली मूल्यं यांवरच दीर्घकाळ टिकणारं आणि प्रभावी कार्य उभं राहतं, असे वळसे पाटील यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

Dilip Walse Patil post on X
Baramati Election News : बारामती निवडणुकीत 1991 ची पुनरावृत्ती होणार; अजितदादा ते सुनेत्रा पवार, जाणून घ्या हा इतिहास...

आता वळसे पाटील यांचे या पोस्टमधील व्यक्तींबाबत केलेले विधान नेमके कुणासाठी, यावरून चर्चांना उधाण आले आहे. ते स्वत:बद्दल बोलत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. वळसे पाटील यांच्या पोस्टवर काहींनी शरद पवार यांच्याविषयी ते बोलत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com