Bharat Vs Canada : भारत-कॅनडा वाद चिघळणार? अमेरिकेसह 'या' बड्या देशांचा कॅनडाला पाठिंबा

Bharat On International Platform : कॅनडाच्या तपास यंत्रणांना भारताचे सहकार्य करण्याचे आवाहन
Justin Trudeau, Narendra Modi
Justin Trudeau, Narendra ModiSarkarnama

Delhi News : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा आरोप करत कॅनडाने त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे. कॅनडाच्या या भूमिकेला उभय देशातील संबंध कमालीचे ताणले आहेत. आता याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले आहेत. भारताने तपासात कॅनडाला सहकार्यचे आवाहन ब्रिटेन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी केले आहे. परिणामी जी २० परिषदेच्या काही दिवसांतच आंतराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधी वातावरण निर्माण होण्याची चिंता आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

कॅनडात जूनमध्ये दोन अज्ञात हल्लेखोरांनी हरदीपसिंग निज्जर यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. निज्जर हा खलिस्तान समर्थक असल्याने या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याची शक्यता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी म्हटले. त्यानुसार कॅनडातील तपास यंत्रणा सखोल चौकशी करत असल्याचेही निवेदन त्यांनी कॅनडाच्या संसदेसमोर केले. तसेच कॅनडाने तेथील भारतीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. (Maharashtra Political News)

कॅनडाच्या या कृतीवर भारतानेही प्रत्युत्तरादाखल कॅनडाच्या दिल्लीतील उच्चपदस्थाची हकालपट्टी केली. त्यानंतर कॅनडाने जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांना अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करण्याच्या सूचना केल्या. भारतानेही कॅनडातील नागरिकांना सतर्क राहण्याबाबत आवाहनाच्या अॅडव्हायजरी जारी केल्या.

Justin Trudeau, Narendra Modi
India Vs Canada : भारताचं कॅनडाला जशास तसं उत्तर; राजदूताची केली थेट हकालपट्टी

आरोप-प्रत्यारोपांमुळे भारत आणि कॅनडातील (Bharat Vs Canada) संबंध कमालीचे ताणले आहेत. अशा वातावरणातच ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारताविरोधी भूमिका घेत कॅनडाला पाठिंबा दिला आहे. या मुद्द्यावर ब्रिटनच्या संसदेत भारतीय वंशाच्या खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे. ब्रिटनच्या संसदेतील शीख खासदारांनी जगभरातील शिख घाबरल्याचा दावा केला आहे.'हे प्रकरण गंभीर होत चालले आहे. देशातील व विदेशातील अनेक संभ्रमित, संतप्त आणि घाबरलेल्या शीख व्यक्तींचे फोन येत आहेत,' असे त्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून, 'कॅनडा आणि भारत यांच्यात जे काही सुरू आहे ते सर्व चिंताजनक आहे. या घडामोडींवर आमचे लक्ष आहोत. दरम्यान, या प्रकरणी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांकडे आम्ही काळजी व्यक्त केलेली आहे.'

अमेरिकेने उभय देशांतील संबंधाबाबत बोलताना म्हटले की, “कॅनडाने भारतावर केलेले आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाचा तपास कॅनडाच्या तपास यंत्रणा करत आहेत. त्यांच्या तपासावर परिणाम होईल असे वक्तव्य करणार नाही. हा तपास पारदर्शीपणे व्हावा. त्यातून कॅनडाच्या नागरिकांना उत्तर मिळावे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे भारताला आम्ही विनंती करतो की, त्यांनी या तपासात कॅनडाला सहकार्य करावे.'

ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड हे 'आय 5' या गटाचे सदस्य आहेत. यातील तीन सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता फक्त न्यूझीलंडच्या अधिकृत भूमिकेकडे जगाचे लक्ष आहे. दरम्यान, कॅनडा आणि भारत तणाव वाढताना जस्टिन ट्रुडो म्हणाले, 'भारतानं या प्रकरणाचा गांभीर्यानं विचार करावा यासाठी आपण काही निर्णय घेतले आहेत. उभय देशात कुठल्याही प्रकारचा तणाव वाढवण्याचा आपला हेतू नव्हता.'

(Edited by Sunil Dhumal)

Justin Trudeau, Narendra Modi
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : राधाकृष्ण विखे - बाळासाहेब थोरातांमध्ये खडाखडी; नेमकं काय झालं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com