Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : राधाकृष्ण विखे - बाळासाहेब थोरातांमध्ये खडाखडी; नेमकं काय झालं?

Revenue Officer in Ahmednagar : संगमनेरमध्ये वाळू तस्कर वाढल्याच्या तक्रारी वाढल्याचे सांगून विखेंचा थोरातांना घेरण्याचा प्रयत्न
Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar Political News : संगमनेरमध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांनी बोलावलेल्या तालुका टंचाई बैठकीला प्रांताधिकारी आणि तहसीलदार अनुपस्थित होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी बोलावलेल्या बैठकीला प्रांत-तहसीलदारांनी उपस्थिती लावली होती. यावरून थोरात-विखे यांच्यात चांगलीच खडाखडी झाली. 'आपणही महसूलमंत्री होतो, मात्र असे वागलो नाही,' असे म्हणत पालकमंत्री विखेंवर पालकत्वाच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्याला आता विखेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे नगरमधील राजकीय वातावरण तापल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी थोरातांवर पलटवार करताना म्हटले, महसूलमंत्री असताना थोरातांनी टंचाई आराखडा तयार केला. तो संपूर्ण राज्याला भूषणावह असल्याचे ते सांगत सुटले. मात्र, गेली ३० ते ३५ वर्षांपासून या संगमनेर तालुक्यातीळ टँकर कमी करून जनतेला पाणी देऊ शकले नाहीत. मग कोणत्या अर्थाने त्यांचा टंचाई आराखडा राज्याला भूषणावह आहे, हे त्यांनी सांगावे, अशा शब्दांत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांची खरडपट्टी काढली.

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Women Reservation Bill : महिला आरक्षणाला विरोध करणारे 'ते' दोन खासदार कोण ?

'संपूर्ण राज्यात आपण वाळूउपशावर बंदी आणली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यामध्ये वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के वाळूचा गोरख धंदा बंद झालाच पाहिजे,' अशी ताकीद विखेंनी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली आहे. तसेच 'कोणी वाळूतस्करांना पाठीशी घालतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,' असा इशाराही महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिला आहे. (Maharashtra Political News)

'मी पालकत्व कसे करावे, हे मला कुणी शिकविण्याची गरज नाही,' असा टोलाही महसूलमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना नाव न घेता लगावला आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळामुळे लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. त्यातच विरोधकांच्या टंचाई बैठकीत अधिकारी उपस्थित राहत नसल्याने आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. विखे-थोरांतांमधील शाब्दिक चकमक वाढल्याने जिल्ह्यातील वातावरण गरम झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Balasaheb Thorat, Radhakrishna Vikhe Patil
Udhayanidhi Stalin News : यालाच म्हणतात, 'सनातन धर्म' ; उदयनिधी पुन्हा बरळले ; संसद भवनाच्या उद्धघाटनाला राष्ट्रपतींना...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com