Bhole Baba and Hathras Stampede: हाथरसमधील चेंगराचेंगरीच्या भीषण दुर्घटनेनंतर भोलेबाबा फरार, फोनही बंद; पोलिसांकडून शोध सुरू!

Hathras Stampede Accident News : आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 116 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Bhole Baba and Hathras Stampede
Bhole Baba and Hathras StampedeSarkarnama

Hathras Stampede News Update : उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील सिकंदराराऊ भागात आयोजित एका भव्य सत्संग समारंभाच्या ठिकाणी मंगळवारी चेंगराचेंगरी होवून मोठी दुर्घटना घडली. यामध्ये आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 116 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेनंतर पोलिसांनी आयोजकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर कारवाईचेही निर्देश दिले आहेत. या दरम्यान ज्यांनी हा सत्संग आयोजित केला होता, ते भोले बाबा आता फरार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलीस त्यांचा शोध घेत असून, बाबा नारायण हरी अर्था भोले बाबा यांचा फोनही बंद येत आहे. ते हाथरसच्या बाहेर पडल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे पोलिसांना 24 तासांच्या आत मुख्यमंत्री योगींसमोर(CM Yogi) तपासाचा अहवाल सादर करायाचा आहे. ही केवळ दुर्घटना आहे की षडयंत्र याचाही शोध घेण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Bhole Baba and Hathras Stampede
UP Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना! सत्संगात चेंगराचेंगरी, 116 जणांचा करुण अंत; CM योगींनी घेतली गंभीर दखल

भोलेबाबांचे सत्संगात सहभागी होण्यासाठी आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले होते. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मथुरा,फिरोजाबाद,एटा,आग्रा येथून आलेल्या भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

या दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरील 'X' माध्यमांवर पोस्ट शेअर करत सद्भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

Bhole Baba and Hathras Stampede
PM Narendra Modi : बालकबुध्दी... तुम से नही हो पायेगा! मोदींकडून राहुल गांधींवर कारवाईचे संकेत

या दुर्घटनेचं एक मोठं कारण समोर आलं आहे. भोले बाबाची गाडी जाताना निघणाऱ्या गर्दीला अडवण्यात आलं होतं. त्यांचा ताफा गेल्यानंतर एकदमच गर्दी सोडण्यात आली, त्यामुळे मागून येणाऱ्या लोकांनी समोर असणाऱ्यांना चिरडलं. एकदमच पळापळ सुरू झाली. यामध्ये लोक एकमेकांना तुडवत निघाले आणि त्यातच शंभराहून अधिकजणांचा जागीच मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com