UP Hathras Satsang Stampede : उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना! सत्संगात चेंगराचेंगरी, 116 जणांचा करुण अंत; CM योगींनी घेतली गंभीर दखल

Hathras Satsang Stampede Incidents : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संग सुरु होता. चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
UP Hathras Satsang Stampede
UP Hathras Satsang StampedeSarkarnama

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येणार आहे. हाथरस येथे आयोजित धार्मिक सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत तब्बल 116 हून अधिक जणांचा करुण अंत झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर 150 हून अधिक भाविक जखमी आहेत.

भोलेबाबांचे सत्संगात सहभागी होण्यासाठी आणि त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी हाथरस एटा सीमेजवळील रतिभानपूर या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक एकत्र आले होते. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मथुरा,फिरोजाबाद,एटा,आग्रा येथून आलेल्या भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

हाथरस येथील घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मीडियावरील 'X' माध्यमांवर पोस्ट शेअर करत सद्भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत या संपूर्ण घटनेची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे.

नेमकं काय घडलं..?

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संग सुरु होता. चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. चेंगराचेंगरीत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.भोले बाबांच्या सत्संगाचा समारोप सोहळा सुरू असतानाच तिथे उष्णतेमुळे भाविक मंडपातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना मोठी गर्दी उसळली. आणि त्याठिकाणी चेंगराचेंगरीची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी एटा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आलं आहे.

UP Hathras Satsang Stampede
PM Narendra Modi : बालकबुध्दी... तुम से नही हो पायेगा! मोदींकडून राहुल गांधींवर कारवाईचे संकेत

योगी आदित्यनाथ काय म्हणाले..?

हाथरस घटनेत ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या प्रती मी दुःख व्यक्त करतो.उत्तर प्रदेश सरकार या सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने या संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.राज्य सरकारकडून युध्द पातळीवर बचाव कार्य सुरू आहे.सगळ्या जखमींना हवी ती मदत केली जाईल असे योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanath) म्हणाले आहेत.

या दुर्घटनाप्रकरणी जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.या कार्यक्रमासाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती.परंतू, हा सत्संगाचा कार्यक्रम एक खासगी कार्यक्रम होता.आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती हाथरसचे डीएम आशिष कुमार यांनी दिली आहे.दुर्घटनास्थळी शक्य ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचे प्राथमिक लक्ष असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

राष्ट्रपती मूर्म काय म्हणाल्या...?

राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी हाथरस येथीस घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात झालेल्या अपघातात महिला आणि लहान मुलांसह अनेक भाविकांचा मृत्यू झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. ज्यांनी त्यांचे कुटुंबीय गमावले त्यांच्याबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करते आणि जखमींनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करते.

UP Hathras Satsang Stampede
Vidhan Parishad Election News : मोठी बातमी ! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोडाफोडी;कोणाचे आमदार फुटणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com