Wrestler Protest Big Update : मोठी बातमी! भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांना दिल्ली पोलिसांची 'या' प्रकरणी क्लिन चिट

Brij Bhushan Singh News : दिल्ली पोलिसांकडून सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार होतं. मात्र...
Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष व भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत आंदोलन छेडलं होतं. यामुळे राजकीयसह क्रीडा क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली होती. सुमारे दीड महिन्यांहून अधिक काळ सुरु राहिलेल्या आंदोलनानंतर अखेर क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलं.

यानंतर या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांकडून सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार होतं. मात्र, त्याऐवजी त्यांनी 'क्लोजर रिपोर्ट' म्हणजे सबळ पुराव्याअभावी गुन्ह्याचा तपास बंद करण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितल्याची माहिती समोर येत आहे.

Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh News Update : विनयभंग झालेल्या कुस्तीपटुंकडे पोलिसांनी मागितले ते फोटो अन् व्हिडिओ..

भारतीय कुस्ती परिषदेचे सर्वेसर्वा आणि खासदार ब्रिजभूषण सिंह(Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लावलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवरून दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (दि.१५) दोन न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तर पतियाळा न्यायालयात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून दुसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले.

अल्पवयीन मुलीने केलेल्या आरोपांमध्ये दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांना क्लिन चिट दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. पोक्सो (POCSO)नुसार दाखल गुन्ह्यासाठी समर्पक पुरावे आढळून येत नसल्यानं हे गुन्हे रद्द करावेत अशी याचिका दिल्ली पोलिसांनी न्यायालयात सादर केली आहे.

Brij Bhushan Singh
Brij Bhushan Singh News : ब्रिजभूषण सिंह यांच्यासाठी 'या' पक्षाचे दरवाजे बंद ; आंदोलनाच्या महिन्यानंतर..

काय आहे प्रकरण ?

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर दोनवेळा आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान ब्रिजभूषण सिंह यांच्यावर दोन एफआयआर देखील दाखल झाले. मात्र, आंदोलक कुस्तीपटू(Wrestler Protest) सिंह यांच्या अटकेच्या मागणीवर ठाम होते. देशाचे पदक विजेते कुस्तीपटूंचं जवळपास दीड महिन्यांहून अधिक काळ आंदोलन करत होते. 18 जानेवारीला पहिल्यांदा कुस्तीपटूंनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. त्यानंतर 23 एप्रिलला दुसर्‍यांदा त्यांनी आंदोलन केले.

या आंदोलनावेळी कुस्तीपटूंची आणि पोलिसांची झटापटदेखील झाली. यानंतर नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी पोलिसांनी बळाचा वापार करत कुस्तीपटूंना जंतर-मंतरवरून हलवले. यामुळे आंदोलनाला वेगळेच वळण लागले.

Brij Bhushan Singh
Thackeray Vs Shinde : ठाकरे गटातून गळती सुरुच ; मुख्यमंत्र्यांचं टि्वट ; माजी नगरसेविका..

15 जूनपर्यंत आंदोलन स्थगित....

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले होते. मात्र, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन 15 जूनपर्यंत स्थगित केले असल्याची माहिती कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी दिली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com