Women Reservation Bill : मोठी बातमी! महिला आरक्षण विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर

Special Session In New Parliament : महिला आरक्षण विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली.
Women Reservation Bill
Women Reservation BillSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: मोदी सरकारने बोलावलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात बुधवारी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन विधेयक) बहुमताने मंजूर झाले आहे. या महिला आरक्षण विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली. तर या विधेयकाविरोधात दोन मते पडली. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले आहे. आता हे विधेयक गुरुवारी मंजुरीसाठी राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Women Reservation Bill
Sonia Gandhi News : सोनिया गांधींची मोठी घोषणा, महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; 'इंडिया' आघाडीतील मित्रपक्षांची होणार कोंडी ?

महिला आरक्षण विधेयकावर बुधवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी या विधेयकाच्यासंदर्भाने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर लोकसभेत महिला आरक्षणाच्या या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. या विधेयकाच्या बाजुने 454 मते पडली. तर विधेयकाच्या विरोधात दोन मते पडली. त्यामुळे एक तृतियांश पेक्षा जास्त मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.

नारी शक्ती वंदन विधेयक (महिला आरक्षण विधेयक) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा होणार आहे. राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग होणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

Women Reservation Bill
Rahul Gandhi On Women Reservation Bill : आजच विधेयक लागू करा; महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधींचा पाठिंबा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com