Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Rahul Gandhi On Women Reservation Bill : आजच विधेयक लागू करा; महिला आरक्षण विधेयकाला राहुल गांधींचा पाठिंबा

Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावर आपलं मत मांडलं.
Published on

Delhi News: मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले असून, या विधेयकावर सध्या लोकसभेच्या सभागृहात चर्चा सुरू आहे. या विधेयकावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील आपलं मत मांडलं. या वेळी राहुल गांधींनी महिला आरक्षण विधेयकाचं समर्थन केलं. तसेच हे महिला आरक्षण विधेयक आजच पारित करा, असे मतही त्यांनी सभागृहात बोलताना मांडलं.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

केंद्र सरकारच्या या महिला आरक्षणाच्या विधेयकावर बुधवारी विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने सत्ताधारी, विरोधकांसह संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्याकडे लागले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी देखील महिला आरक्षण विधेयकाचे समर्थन केले. मात्र, याचवेळी राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणावरून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

Rahul Gandhi
Sonia Gandhi News : सोनिया गांधींची मोठी घोषणा, महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; 'इंडिया' आघाडीतील मित्रपक्षांची होणार कोंडी ?

राहुल गांधींनी लोकसभेत जोरदार भाषण करत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच जातीय जनगणनेपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. सरकारच्या 90 सेक्रेटरीमध्ये ओबीसी समाजाचे फक्त तीनच सेक्रेटरी असल्याचा मुद्दाही त्यांनी या वेळी मांडला.

"मी महिला आरक्षणाच्या विधेयकाचे समर्थन करतो. महिला आरक्षण हे मोठं पाऊल आहे. आजच महिला आरक्षण विधेयक पारित व्हायला हवं, असे म्हणत मोदींनी ओबीसी समाजासाठी काय काम केलं", असा सवालही राहुल गांधींनी या वेळी विचारला.

Rahul Gandhi
India Vs Canada : भारत - कॅनडामध्ये तणाव ? केंद्र सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायझरी; कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com