Sonia Gandhi News : सोनिया गांधींची मोठी घोषणा, महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा; 'इंडिया' आघाडीतील मित्रपक्षांची होणार कोंडी ?

Women Reservation Bill : '' महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते....''
Sonia Gandhi On Women Reservation :
Sonia Gandhi On Women Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi Political News : केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं आहे. बुधवारी या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. याचवेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधीदेखील केंद्र सरकारच्या महिला विधेयकावर बोलणार असल्यामुळे सत्ताधारी, विरोधकांसह संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या भाषणाकडे लागलेलं होतं. त्या काय भूमिका घेणार यावर विरोधकांच्या इंडिया आघाडीतदेखील पडसाद उमटणार होते. मात्र, सोनिया गांधी यांनी मोदी सरकारच्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. पण आता काँग्रेसच्या भूमिकेमुळे आता इंडिया आघाडीतील मित्रपक्षांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

संसदेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीदेखील सहभाग घेतला. त्यांनी विरोधकांच्या बाजूने काँग्रेसकडून सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) या चर्चेची सुरुवात केली. या वेळी त्यांनी महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होतं, असं म्हणत 'नारी शक्ती वंदना' कायद्याला पाठिंबा दिला आहे. मात्र, याचवेळी आरक्षणासोबत जातनिहाय जनगणनादेखील करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Sonia Gandhi On Women Reservation :
Bachchu Kadu News : महिला आरक्षण विधेयकावर बच्चू कडूंचं वादग्रस्त विधान; म्हणाले, " 75 टक्के महिला खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी..."

सोनिया गांधी म्हणाल्या, भारतीय स्त्री अत्यंत सक्षम असून, महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. महिला आरक्षण हे राजीव गांधींचं स्वप्न होते. महिला आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असल्यचे सोनिया गांधी म्हणाल्या. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणनादेखील करा नाहीतर एससी आणि एसटींची संख्या कशी कळणार? तसेच लवकरात लवकर आरक्षण लागू करावे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

तसेच भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणं खूप कठीण काम आहे. भारतीय महिलांनी कधीही तक्रार केलेली नाही. महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. लवकरात लवकर हे आरक्षण लागू करावे, असंही त्या म्हणाल्या.

महिला आरक्षणानंतर काय होणार...?

नव्या संसदेत कामकाजाची सुरुवात महिला आरक्षण विधेयकाने होणार आहे. नव्या संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाची घोषणा केली आणि या विधेयकाचे नाव 'नारी शक्ती वंदन अधिनियम' असेल असे सांगितले. मोदींच्या घोषणेनंतर कायदा केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळू शकणार आहे.

याशिवाय अनुसूचित जाती-जमातींसाठी आधीच ठरलेल्या एकूण जागांपैकी 33 टक्के आरक्षण अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांसाठी असेल. या आरक्षणासाठी राखीव मतदारसंघांचा फेरबदल करण्यात येणार आहे. विधेयकात ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षणाची वेगळी तरतूद नाही. अशा स्थितीत आरजेडी, समाजवादी पक्ष आणि जेडीयू या पक्षांची भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. ओबीसी प्रवर्ग हिताचे राजकारण करणाऱ्या पक्षांची भूमिका काय असणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Women Reservation Bill)

Sonia Gandhi On Women Reservation :
Nagpur OBC Movement : ओबीसी आंदोलनाची धग कायम; सरकारच्या निर्णयाची रविवारपर्यंत प्रतीक्षा, अन् त्यानंतर...

सोनिया गांधी यांच्या संसदेतील संबोधनात, मित्रपक्षांच्या आणि विशेषत: राष्ट्रीय जनता दल, जनता दल युनायटेड आणि समाजवादी पार्टी यांची या विधेयकावर असलेल्या भूमिकेबाबत त्या काय बोलणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या विशेष अधिवेशनात केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी महिला आरक्षण विधेयक सभागृहात ते मांडले.

(Edited By Deepak Kulkarni)

Sonia Gandhi On Women Reservation :
India Vs Canada : भारत - कॅनडामध्ये तणाव ? केंद्र सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायझरी; कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com