Hemant Soren News : हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ; 'ED'ची याचिका फेटाळली!

ED and Hemant Soren : झारखंड उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाविरोधात ED ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
Hemant Soren
Hemant Soren Sarkarnama
Published on
Updated on

Relief to Hemant Soren from Supreme Court : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हेमंत सोरेन यांचा जामीन कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन आदेशात दखल देण्यास निकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने हेमंत सोरेन यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनाविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने(ED) दाखल केलेली याचिका फेटाळली आहे.

ED ने झारखंड उच्च न्यायालयाच्या जामीन आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायायाने म्हटले की झारखंड उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अतिशय तर्कसंगत आहे. आम्ही आदेशात दखल देण्यास इच्छुक नाही आहोत. तथापि, उच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

Hemant Soren
Lok Sabha Session : राहुल गांधींनी 6 जणांची नावं घेत भाजपला चक्रव्युहात अडकवलं!

झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजेच JMM नेते हेमंत सोरेन(Hemant Soren) यांना भूमी घोटाळ्याशी निगडीत मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने 31 जानेवारी रोजी अटक केली होती. अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर सोरेन यांनी 4 जुलै रोजी पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. झारखंड उच्च न्यायालयाने सोरेन यांना जामीन देत म्हटले होते की, या प्रकरणाचा विचार करता याचिकाकर्त्याने तत्सम स्वरुपाचा गुन्हा करण्याची शक्यता नाही.

Hemant Soren
Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी 'तो' फोटो दाखवला अन् हलव्यावरून भाषण ठोकलं; सीतारामण यांनी डोक्यालाच हात लावला...   

तर दुसरीकडे सोरेन यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शवत ईडीने आरोप केला होता की, त्यांनी बडगाम अंचलमध्ये 8.86 एकर जमीन अवैधरित्या मिळवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा दुरुपयोग केला होता. ईडीने दावा केला होता की, तपासादरम्यान हेमंत सोरेन यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद यांनी स्वीकार केला होता की, माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भूखंडाच्या मालिकीत बदल करण्यासाठी अधिकृत आकडेवारीशी छेडाछाड करण्याचे निर्देश दिले होते.

ईडीने म्हटले होते की भूखंडावर कब्जा केला जात होता. तेव्हा त्याचे खरे मालक राजकुमार पाहन यांनी तक्रारअर्ज दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावर कधीही कारवाई झाली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com