
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगुल अखेल वाजलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत सोमवार, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी याची घोषणा केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही पत्रकार परिषद घेतली. त्यामुळं आता बिहारमध्ये प्रचाराला वेग येणार असून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतील.
निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदार याद्यांचं शुद्धिकरण अर्थात एसआयआर योजना राबवली. ३० सप्टेंबर २०२५ रोजी याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली, अशी माहिती यावेळी आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी दिली. या एसआयआर प्रक्रियेद्वारे पात्र मतदार यादीतून बाहेर राहता कामा नयेत तसंच अपात्र मतदार यादीत येता कामा नयेत, याची काळजी घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मतदानासाठी आलेल्या मतदारांना आपले फोन मतदान केंद्राबाहेरच ठेवावे लागणार आहेत. त्यासाठी बाहेर मोबाईल ठेवण्याची सोय केली जाणार आहे. त्याचबरोबर क्रमानं मतदार यादीतील नावं मतदार यादीत दिसणार आहेत, यामुळं मतदारांचं व्हिरिफिकेशन करणं सोप होणार आहे, अशी माहितीही यावेळी आयुक्तांनी दिली. तसंच ज्या मतदारांचं नाव यादीत आलेलं नाही त्यांनी आपलं नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी अद्यापही नोंदणी करता येणार असल्याची महत्वाची माहिती यावेळी निवडणूक आयुक्तांनी दिली.
दरम्यान, सात राज्यांमध्ये विविध कारणांमुळं रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणाही यावेळी निवडणूक आयोगानं केली. त्यानुसार, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान, झारखंड, तेलंगणा, पंजाब, मिझोराम, ओडिशा या राज्यांमध्ये रिक्त झालेल्या जागांवर ११ नोव्हेंबरला मतदान पाडणार आहे तर १४ नोव्हेंबरला याचा निकाल जाहीर होणार आहे.
बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा असून १२२ ही मॅजिक फिगर आहे. गेल्या वेळेला २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा होत्या हे पाहुयात.
पक्षीय बलाबल
राष्ट्रीय जनता दल (RJD) : ७५ जागा
भारतीय जनता पार्टी (BJP) : ७४ seats
जनता दल युनायटेड (JDU) : ४३ seats
काँग्रेस (INC) : १९ seats
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) (CPIML): १२ seats
उर्वरित २० जागा या छोटे पक्ष आणि अपक्ष यांना मिळाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.