Floods: महापूराची पहाणी करायला गेलेल्या भाजप आमदार-खासदाराला बेदम मारहाण; केलं रक्तबंबाळ

Floods: पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या खासदार आणि आमदारावर स्थानिक लोकांनी हल्ला चढवला.
Flood
FloodSarkarnama
Published on
Updated on

Bihar Floods: पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी गेलेल्या भाजपच्या खासदार आणि आमदारावर स्थानिक लोकांनी हल्ला चढवला. जखमी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांना उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण बनलं होतं.

Flood
Gautami Patil: गौतमी पाटील सहीसलामत सुटली! पुणे पोलिसांनी प्रचंड राबून केला तपास

पश्चिम बंगालच्या नागरकाटा भागात सध्या पुरानं थैमान घातलं आहे. याठिकाणी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी भाजपचे आमदार शंकर घोष आणि खासदार खगेन मुर्मू यांच्यावर स्थानिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात भाजपचे नेते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भाजपच्या नेत्यांनी या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. हल्ल्यानंतर भाजपचे आमदार-खासदार घटनास्थळावरुन निघून जात असताना संतप्त जमावानं त्यांच्या कारवर दगडफेक केली. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे.

Flood
Anil Deshmukh attack case : अनिल देशमुख यांच्यावरच्या हल्ल्याची स्क्रिप्ट पुन्हा बदलली?

लोकांनी केलेल्या दगडफेकीत खासदार खगेन मुर्मू यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर आमदार शंकर घोष यांच्या चेहऱ्यावर जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण बनलं आहे.

Flood
CJI Bhushan Gavai update : सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची माहिती समोर; घटनेनंतर CJI गवई काय म्हणाले?

या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपनं या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. तर काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, पुराच्या संकटानंतर मदतीसाठी उशीर झाल्यानं तसंच दिलासा मिळत नसल्यानं हे कृत्य घडलं असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरु केला आहे. पण अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

Flood
Maharashtra municipal reservation : राज्यातील 147 पैकी 74 नगरपंचायतींमध्ये महिलाराज; एका क्लिकवर जाणून घ्या आरक्षणाची संपूर्ण यादी

दरम्यानं, गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि पुरामुळं उत्तर बंगालमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला. यानंतर नागराकाटासह अनेक भागांत बचाव पथकाकडून बचाव कार्य राबवण्यात आलं. पण यावेळी मोठी तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com