Bihar Assembly Election 2025: एक्झिट पोल किती खरे ठरले? 'या' एजन्सीनं सांगितला होता सर्वाधिक अचूक आकडा

Bihar Assembly Election 2025: बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर जवळपास १५ एक्झिट पोल्स समोर आले होते. यासर्वांनीच एनडीएला बहुमत मिळताना दाखवलं होतं. पण तरीही कोणाचा अंदाज जवळपास खरा ठरला आहे, जाणून घेऊयात.
Bihar Assembly Election 2025
Bihar Assembly Election 2025Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. अद्याप संपूर्ण निकाल जाहीर झालेला नाही, पण यामध्ये सत्ताधारी एनडीएनं सत्ता राखणार असल्याचं चित्र आहे. कारण एनडीएचे उमेदवार सध्या २०३ जागांवर आघाडीवर आहेत. तर काँग्रेस-आरजेडीच्या महागठबंधनला धोबीपछाड मिळाली असून त्यांना केवळ ३४ जागांवर आघाडी मिळाली आहे.

यामध्ये राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाला तर भोपळाही फोडता आलेला नाही. दुसऱ्या टप्प्यातील आणि अंतिम मतदानानंतर १५ एजन्सीजनं एक्झिट पोल्स जाहीर केले होते. यामध्ये देखील सर्वच एजन्सीजकडून आजच्या निकालाप्रमाणेच सरासरी दाखवण्यात आली होती. पण त्यातही कोणत्या एजन्सीनं अचूक आकडा सांगतला होता, हे जाणून घेऊयात.

Bihar Assembly Election 2025
Mahayuti Dispute : भाजपचा सत्तेचा ‘मास्टर प्लॅन’ अजितदादांची राष्ट्रवादी हाणून पाडणार; एकतर्फी वाटणारी निवडणूक कठीण

बिहारमध्ये यंदा सर्वाधिक मतदान

बिहारमध्ये २४३ विधानसभा जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडलं होतं. यामध्ये ६ नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात ६५.०८ टक्के मतदान झालं होतं. तर ११ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यात ६८.६९ टक्के मतदान पार पडलं होतं. म्हणजेच एकूण मतदानाची टक्केवारी ही ६७.१३ टक्के इतकी होती. बिहारमध्ये आत्तापर्यंत झालेलं हे सर्वाधिक मतदान असल्याचं सांगितलं जात आहे. दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ एजन्सीजनं एक्झिट पोल्स जाहीर केले होते.

यामध्ये पोल डायरी, प्रजा पोल अॅनेलेटिक्स, मॅट्रिज आयएएनएस, टीआयएफ रिसर्च, पी-मार्क, पिपल्स पल्स, डीव्ही रिसर्च, जेव्हीसी पोल, पिपल्स इनसाईट, पोलस्ट्रॅट, चाणक्य स्ट्रॅटजीज, कामाख्या अॅनॅलेटिक्स, एआय पॉलिटिक्स, अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्य या एजन्सीजचा समावेश होता.

Bihar Assembly Election 2025
BJP wins By- Election : बिहारसोबत आणखी एका राज्यात 'कमळ' फुललं; राणांचा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय!

११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर लगेचच ११ एक्झिट पोल्स जाहीर झाले होते. यामध्ये मॅट्रिज आयएएनएस, पिपल्स पल्स, जेव्हीसी पोल, पिपल्स इनसाईट, चाणक्य स्ट्रॅटजीज, पोल स्ट्रॅट, पोल डायरी, प्रजा पोल अॅनॅलेटिक्स, टीआयएफ रिसर्च, पी-मार्क, डीव्ही रिसर्च आणि कामख्या अॅनॅलेटिक्स या एजन्सीजनं आपले अंदाज वर्तवले होते.

Bihar Assembly Election 2025
Ajit Pawar in Bihar : ‘एनडीए’च्या लाटेत अजितदादा तरले की हरले? ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचे आकडे वाचून बसेल धक्का...

'या' एजन्सीजचा अंदाज जवळपास खरा

तर मतदानाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी काही तासांचा वेळ घेऊन इतर तीन एजन्सीजनं आपले अंदाज वर्तवले होते. यामध्ये एआय पॉलिटिक्स, अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्य या एजन्सीजचा समावेश होता. यांपैकी ए आय पॉलिटिक्सनं एनडीए आणि महागठबंधन या दोन्ही आघाड्यांमध्ये 'काँटे की टक्कर' होईल असा अंदाज वर्तवला होता. तर अॅक्सिस माय इंडिया आणि टुडेज चाणक्यनं एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com