Bihar assembly election : राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपला सहा, तर काँग्रेस दहा ठिकाणी उमेदवारच नाही

Bihar Election BJP, Congress Fail to Get Candidates on 16 Seats : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय आखाडा रंगला असून, सर्व पक्षांकडून जोरदारप्रचार सुरू आहे.
Bihar assembly election
Bihar assembly electionSarkarnama
Published on
Updated on

Bihar election news : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीविरुद्ध काँग्रेसचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात सामना रंगला आहे.

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) अन् इंडिया आघाडी यांच्यात निवडणुकीसाठी जोरदारप्रचार सुरू आहे. परंतु जागावाटपाच्या घोळात राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस अन् भाजपला बिहारमध्ये काही जिल्ह्यांमध्ये उमेदवार देखील देता आलेला नाही.

जागावाटपाच्या घोळात बिहारमधील सहा जिल्ह्यांमध्ये भाजपचा (BJP) आणि अरवल या जिल्ह्यात संयुक्त जनता दलाचा (JDU) एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. तर इंडिया आघाडीतील जागावाटपामुळे बिहारमधील तब्बल 10 जिल्ह्यांत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही.

बिहारमधील प्रादेशिक पक्ष असलेल्या विकासशील इन्सान पार्टीचे (VIP) फक्त नऊ जिल्ह्यांतच उमेदवार असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष- मार्क्सवादी लेनिनवादी (CPIML) या पक्षाचे उमेदवार केवळ 13 जिल्ह्यांतूनच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे 38 जिल्हे असलेल्या आणि 243 विधानसभा मतदारसंघ असलेल्या बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचेच (RJD) सर्व जिल्ह्यात उमेदवार असून, रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जन सुराज्य पक्षाने देखील सर्व 243 जागांवर उमेदवार उभे केल्याचा दावा केला आहे.

Bihar assembly election
Maharashtra Debt Crisis : राज्य सरकार किती कर्जबाजारी! माजी आमदारानं आकडेवारीच मांडली

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा (HM) या पक्षाला सहा जागा मिळाल्या असून, त्यांनी गया, जहानाबाद आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतून आपले उमेदवार उभे केले आहेत.

Bihar assembly election
Prakash Ambedkar Vs Bacchu Kadu : बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा, आंबेडकरांची खोचक प्रतिक्रिया; मंत्रिपद असताना काय ** मारत होता का?

भाजपचे उमेदवार नसलेले जिल्हा : मधेपूरा, खगडिया, शेखपूरा, शिवहर, जहानाबाद आणि रोहतास

काँग्रेसचे उमेदवार नसलेले जिल्हा : भोजपुर, जहानाबाद, कैमूर (भभुआ), अरवल, सीवान, सारण (छपरा), शिवहर, मधुबनी, मधेपुरा, मुंगेर

भाजपच्या सहा नेत्यांचे निलंबन

बिहारमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्याप्रकरणी भाजपने पक्षातील सहा नेत्यांचे निलंबन केले असून त्यामध्ये कहलगावचे आमदार पवन यादव यांचादेखील समावेश आहे. भाजपकडून रविवारी संध्याकाळी याबाबत अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार या सहा नेत्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वदेखील रद्द करण्यात आले आहे. सनी यादव, श्रवण कुशवाह, उत्तम चौधरी, मारुती नंदन मारुती आणि पवन चौधरी या सहा जणांना निलंबित करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com