Bihar Election Voting: बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का वाढला, प्रशांत किशोर यांचा मोठा दावा

Bihar Assembly Election 2025: बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपला सत्ता मिळवण्यात यश आल असलं,तरी आजतागायत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवता आलेला नाही. त्याचमुळे भाजपनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. निकालानंतर राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Prashant Kishor
Prashant KishorSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. तिथे एनडीए आणि इंडिया आघाडी अशी थेट लढत होत आहे. बिहार विधानसभेच्या 243 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 जागांसाठी मतदान गुरुवारी(ता. 6 नोव्हेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार आहे. पण पहिल्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 60.13 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर वाढलेल्या टक्केवारीचा संदर्भ देत जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी मोठा दावा केला आहे.

बिहारमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पहिल्या टप्प्यात 121 जागांवर 55.81 टक्के मतदान झालं होतं. आता यावेळी बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 64.46 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. आता याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी मोठा दावा केला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान हे जनतेला बदल हवा असल्याचं दाखवत आहे. नवी व्यवस्था येत आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांचा पक्ष यावेळी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. त्यांच्या पक्षाचे किती उमेदवार जिंकतात याबद्दल मोठी उत्सुकता आहे. त्यांनी 2020 नि्वडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान जनतेला बदल हवा असल्याचं सांगत नवी व्यवस्था येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

उत्तर प्रदेश आणि बिहार (Bihar) ही दोन्ही राज्ये देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची मानली जातात. उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्यात भाजपला मोठं यश आले आहे. तसेच तिथे योगी आदित्यनाथांसह भाजपचे आजपर्यंत चार मुख्यमंत्री झाले आहेत. परंतु बिहारसारख्या मोठ्या राज्यात भाजपला सत्ता मिळवण्यात यश आल असलं,तरी आजतागायत आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवता आलेला नाही. त्याचमुळे भाजपनं ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. निकालानंतर राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Prashant Kishor
Beed News : बीडमध्ये एकाच म्यानात दोन तलवारी ; पंकजा मुंडे निवडणुक प्रभारी, तर सुरेश धस प्रमुख!

बिहार विधानसभा यंदाच्या निवडणुकीत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यांत बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसून येत आहे. तसेच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मतदारांचा मतदानासाठी मोठा निरुत्साह दिसून आला. त्यामुळे शहरी भागातील टक्केवारी घसरण पाहायला मिळाली आहे.

बिहारचे मतदार यावेळी कोणत्या आघाडीला सत्तेत बसवणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील 121 विधानसभा मतदारसंघात एकूण 1 हजार 314 उमेदवार रिंगणात उतरले असून यात विशेष म्हणजे 1 हजार 192 पुरुष आणि अवघ्या 122 महिलांचा समावेश आहे.

Prashant Kishor
Amit Shah News: अमित शाह 'प्लॅन' बदलणार, नितीश कुमारांना धक्का देत CM पदासाठी फडणवीसांसारखाच ताकदीचा नेताही हेरला ?

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बेगूसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 67.32 टक्के तर सर्वात कमी शेखपुरा जिल्ह्यात 52.36 टक्के मतदान झाले.राजधानी पाटणामध्ये 55.02. टक्के मतदान झाले आहे.

पहिल्या टप्प्यात सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा या दोन उपमुख्यमंत्र्यांसह 18 मंत्र्‍यांची राजकीय कारकीर्द पणाला लागली आहे. तसेच दुसरीकडे राजदचे नेते व माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, यांच्यासह तेजप्रताप यादव यांच्या लढतींकडे लक्ष लागलेलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com