IAS Kumar Ravi : दिवसभर मुख्यमंत्र्यांसोबत फिरले IAS अधिकारी अन् सायंकाळी थेट मंत्रालयात बदली...

Nitish Kumar Bihar : नितीश कुमार यांनी कुमार रवी यांना बढती देत मुख्यमंत्री सचिवालयात आणले आहे. त्यांच्या कामाची नितीशबाबूंनी दखल घेतल्याची चर्चा आहे.
IAS Kumar Ravi
IAS Kumar RaviSarkarnama
Published on
Updated on

Patna : बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रशासनातही अनेक बदल केले जात असून रविवारी अचानच चार वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत दिवसभर विविध कार्यक्रमांमध्ये फिरणाऱ्या अधिकाऱ्यांनाही सुखद धक्का बसला आहे.

पटना महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहणारे आयएएस कुमार रवी यांची रविवारी मुख्यमंत्री सचिवालयात बदली करण्यात आली आहे. यादिवशी ते सकाळपासूनच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात व्यस्त होते. पटनामध्ये पूरस्थितीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हा दौरा आटोपल्यानंतर काही तासांतच कुमार रवी यांच्या प्रोमोशनचे आदेश निघाले. त्यांच्यासह आणखी तीन अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे.

IAS Kumar Ravi
Independence Day : केजरीवालांकडून आतिशी यांना मोठा मान; स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच असं घडणार...

कोण आहेत कुमार रवी?

कुमार रवी हे 2005 च्या तुकडीचे बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत. रविवारी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात बढती मिळाली आहे. आयआयटी कानपूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. ही पदवी प्राप्त केली. 2001 मध्ये मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनिअर म्हणून करिअरला सुरूवात केली.

नोकरी करत असतानाच यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. 2003 मध्ये IRS मध्ये निवड झाली. त्यानंतर आयकर विभागात सहायक आयुक्त म्हणून रुजू झाले. आयकर विभागात नोकरीत करत असताना IAS तयारी सुरूच ठेवली आणि 2005 मध्ये त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. उपजिल्हाधिकारीपदी त्यांची निवड झाली.

IAS Kumar Ravi
Rahul Gandhi Vs Kangana Ranaut : राहुल गांधी खतरनाक, विध्वंसक, कलंक..! खासदार कंगना एवढ्या का भडकल्या?

बिहारमध्ये सुपौल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पहिल्यांचा काम सुरू केले. त्यानंतर दरभंगा व इतर जिल्ह्यांतही जिल्हाधिकारी म्हणून काम करत प्रशासनात ठसा उमटवला. कुमार रवी यांची 2018 मध्ये पटनाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान त्यांनी अतिक्रमणमुख्त अभियान राबवले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर दिला.

पटनाचे जिल्हाधिकारी आणि सध्या आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे लक्ष वेधून घेतले. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर कुमार रवी यांना मुख्यमंत्री सचिवालयात बदली करण्यात आली आहे. आता ते थेट मुख्यमंत्र्यांसोबत काम करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com