Independence Day : केजरीवालांकडून आतिशी यांना मोठा मान; स्वातंत्र्यदिनी पहिल्यांदाच असं घडणार...

Arvind Kejriwal Atishi : अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये असल्याने स्वातंत्र्यदिनी सरकारकडून ध्वजारोहण कोण करणार, याबाबत उत्सुकता वाढली होती.
Arvind Kejriwal, Atishi
Arvind Kejriwal, AtishiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपच्या नेत्या व मंत्री आतिशी यांना मोठा मान दिला आहे. स्वातंत्र्यदिनी अतिशी या केजरीवालांच्या जागी ध्वजारोहण करतील. नुकतेच जामीनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या मनीष सिसोदिया यांनाही केजरीवालांनी डावलले आहे.

दिल्ली सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे मंत्री गोपाल राय यांनी विभागाच्या सचिवांना याबाबतचे पत्र लिहिले आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आज बैठक झाली. त्यांनी आतिशी यांनी स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यानुसार छत्रसाल स्टेडियम येथील कार्यक्रमात आवश्यक नियोजन करावे, असे आदेश राय यांनी काढले आहेत.

Arvind Kejriwal, Atishi
Rahul Gandhi Vs Kangana Ranaut : राहुल गांधी खतरनाक, विध्वंसक, कलंक..! खासदार कंगना एवढ्या का भडकल्या?

आतिशी या केजरीवालांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जातात. सरकारमध्ये त्यांच्याकडे शिक्षण, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम यांसह आणखी काही महत्वाची खाती आहेत. केजरीवालांसह सिसोदिया, संजय सिंह हे जेलमध्ये असताना त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत घेत सरकारचे कामकाज पाहिले. आताही कोणत्याही सरकारी निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग असल्याचे मानले जाते.

मद्य धोरण घोटाळ्यात मनीष सिसोदिया यांना मागील आठवड्यातच जामीन मंजूर झाल्याने ते जेलबाहेर आले आहेत. आपमध्ये केजरीवालांनंतर सिसोदियांचा क्रमांक लागतो. पण जेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्याकडे सध्या कोणतेही खाते नाही.

Arvind Kejriwal, Atishi
Pooja Khedkar : पूजा खेडकर यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; UPSC, दिल्ली पोलिसांना नोटीस

दिल्ली सरकारचा ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम छत्रसाल स्टेडियम होतो. मुख्यमंत्री या कायक्रमात ध्वजारोहण करतात. पण केजरीवाल जेलमध्ये असल्याने ध्वजारोहण कोण करणार, असा पेच निर्माण झाला होता. अखेर गोपाल राय यांच्या पत्रामुळे आतिशी यांना हा मान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दिल्लीत पहिल्यांच एका कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com