

बिहारमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि ‘इंडिया’ आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुकीनंतर राज्यात ‘इंडिया’ आघाडीचीच सरकार स्थापन होणार असून, निकाल लागल्यानंतर केवळ चार दिवसांत शपथविधी पार पडेल.
तेजस्वी यांनी सांगितले की, "14 नोव्हेंबरला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल आणि 18 नोव्हेंबरला ‘इंडिया’ आघाडी सरकारचा शपथविधी होईल."
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाच्या उमेदवार आणि माजी आमदार अनंत सिंह यांच्या अटकेचाही उल्लेख केला. अनंत सिंह यांच्यावर जन सुराज समर्थक दुलार चंद यादव यांच्या हत्येचा आरोप असून, त्यावर कारवाई करण्यात आली आहे.
तेजस्वी यादव म्हणाले की, राज्यात इतकी गंभीर घटना घडली आहे की कारवाई होणे आवश्यकच होते. त्यांनी पुढे सांगितले की, “आज पंतप्रधान बिहारला येत आहेत, पण त्यांनी हे पाहायला हवे की राज्यात जवळपास दररोज एखादा गुन्हा घडतो. मात्र, जेव्हा महागठबंधन सरकार सत्तेवर येईल, तेव्हा हे सर्व बदलणार आहे.”
तेजस्वी यांनी कायदा-सुव्यवस्थेवरही तीव्र टीका केली. त्यांनी दावा केला की, "26 नोव्हेंबरपूर्वी आम्ही हे सुनिश्चित करू की, कोणताही गुन्हेगार तो कोणत्याही जात, धर्माचा असो तो तुरुंगात जाईल आणि त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होईल."
राज्याच्या जनतेला सुरक्षितता आणि विकास देण्याचे आश्वासन देताना त्यांनी म्हटले की, त्यांच्या सरकारकडून गुन्हेगारांविरुद्ध कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तेजस्वींच्या या विधानांमुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापले असून, निवडणुकीच्या काहीच दिवस आधी त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
तेजस्वी यादवांच्या या दाव्यामुळे बिहारच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे. आता निवडणुकीच्या निकालाकडे आणि त्यानंतरच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.