

अनेक खुनाचे गुन्हे असलेला कुख्यात गुंड राजू भद्रे याची पिंटू शिर्के हत्याकांडातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या डॉन जेलमधून बाहेर पडणार असल्याने मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस त्याचा काय बंदोबस्त करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जन्मठेप कायम ठेवली होती.
नागपूर शहरात पिंटू शिर्के हत्याकांड चांगलेच गाजले होते. राजू भद्रे व त्याच्या साथीदाराने शिर्के यास कनिष्ठ न्यायालयाच्या आवारातच संपवले होते. हे हत्याकांड त्यावेळी चांगलेच गाजले होते. राजू भद्रे या हल्ल्यात सहभागी झाला होता. त्यानंतर भद्रे याची नागपूर शहरात चांगलीच दहशत माजली. सट्ट्याचा अड्डाही तो चालवत होता. काँग्रेसच्या एका नेत्यासोबत त्याने सलगी निर्माण केली होती. त्याच्या प्रचारातही तो उघडपणे फिरला होता.
महापालिकेच्या निवडणुकीत भद्रे यांनी तीन ते चार जागाही आपल्या समर्थकासाठी मागून घेतल्या होत्या. मात्र त्याचे सर्वच समर्थक पराभूत झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राजू भद्रे सक्रिय राहायचा. निवडणुकीच्या काळात त्याच्या माध्यमातून अनेक आपला हेतू साध्य करून घ्यायचे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्याचा निवडणुकीतील उघड सहभाग बंद करण्यात आला होता.
नागपूरचे राजे भोसले कुटुंबियांनी शिर्के यांच्या कुटुंबियांस सक्करदा परिसरातील 21 एकर जागा नजराणा म्हणून दिली होती. यापैकी सात एकर जागेवर माजी नगरसेवक विजय मते व त्याच्या साथीदाराने कब्जा केला होता. या जमिनीच्या वादातून गोळीबार झाला होता. यात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायलयात सुरू होती. आरोपीच्या विरोधात पिंटू शिर्के हा एक साक्षीदार होता.
19 जून 2002 रोजी सुनावणीसाठी शिर्के न्यायालयात आला. विजय मते आणि त्याचे साथीदार यावेळी कोर्टातच दबा धरून बसले होते. शिर्के कोटाच्या बाहेर पडताच त्याच्यावर तलवारी आणि चाकूने हल्ला करण्यात आला. त्याच्यावर तब्बल तलवारीने तब्बल 50 घाव घालण्यात आले होते. या प्रकरणात राजू भद्रे याच्यासह 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या शिक्षेला भद्रे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. काही दिवस तो बेलवर बाहेर होता. याकाळात त्याने आपली दहशत निर्माण केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.