

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये २०२ जागांवर भाजप-जेडीयूसह मित्रपक्षांचा एनडीए आघाडीवर आहे. तर काँग्रेस-आरजेडी ३५ जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये तेजस्वी यादव यांचा निसटता विजय झाला आहे. पण या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे प्रशांत किशोर.
राजकीय रणनितीकार म्हणून ओळख असलेल्या किशोर यांनी जनसुराज नावाचा पक्ष स्थापन केला आणि २०० च्या वर जागांवर निवडणूक लढवली. पण त्यांचा यात दारुण पराभव झाला आहे, कारण त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. उलट त्यांच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान झाल्याचं वृत्त आहे. पण नेमक्या कुठल्या मतदारसंघात आणि कोणत्या उमेदवारांबाबत हे घडलंय जाणून घेऊयात.
सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत जनसुराज पक्षाची मतदानाची एकूण टक्केवारी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेली नाही. ही आकडेवारी इतर या सेक्शनमध्ये अपडेट करण्यात आली आहे. म्हणजेच प्रशांत किशोर यांच्या पक्षाला नेमकं किती मतदान झालं हे वेबसाईटवरुन कळू शकत नाही. पण NOTA (नन ऑफ अबव्ह) अर्थात कोणाही मतदाराला मतदान करायचं नाही यासाठी दाबलेलं ईव्हीएमवरील बटन आणि याला पडलेली एकूण मतं १.८१ टक्के इतकी वेबसाईटवर दिसत आहेत.
दरम्यान, आम आदमी पार्टीला झालेलं मतदान हे 0.30 टक्के इतकं आहे. MIM पक्षाला १.९१ टक्के मतदान झालं आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान हे राष्ट्रीय जनता दलाला (२२.८५ टक्के), त्यानंतर भाजप (२०.२३ टक्के), जनता दल युनायटेडला (१९.१९ टक्के) तर काँग्रेसला (८.७७ टक्के) मतदान पडलं आहे. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टीला (५.४० टक्के) तर डाव्या पक्षांना (४.२८ टक्के) इतकं मतदान झालं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.