Bihar Election Result 2025: बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रात हादरे! महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का?

Bihar Assembly Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकाच निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये एनडीएनं मोठी मुसंडी मारली असून २०८ जागांवर आघाडी घेतली आहे, या बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रात हादरे बसले आहेत.
MVA
MVASarkarnama
Published on
Updated on

Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकाच निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये एनडीएनं मोठी मुसंडी मारली असून २०८ जागांवर आघाडी घेतली आहे, या बिहारच्या निकालाचे महाराष्ट्रात हादरे बसले आहेत. याचा थेट परिणाम महविकास आघाडीवर होऊ शकतो, असा इशाराच काँग्रेस नेत्यानं दिला आहे. पण नेमकं असं काय घडलंय? जाणून घ्या सविस्तर.

MVA
Bihar Election Result: बिहारच्या निकालात 'तीन' मुद्दे ठरले निर्णायक! SIR विरोधात रान पेटवणाऱ्या योगेंद्र यादवांची पहिली प्रतिक्रिया

काँग्रेसवर सडकून टीका

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी बिहारच्या निकालावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसवर सडकून टीका केली होती. त्यांनी म्हटलं होतं की, "जागा वाटपाचा घोळ हा शेवटच्या दिवसापर्यंत असता कामा नये. आता आम्ही नगरपालिकेसाठी काम करत असताना कित्येक ठिकाणी आज १४-१५ तारीख असताना काँग्रेसवाले ही जागा द्या ती जागा द्या, असं इच्छा नसताना करत आहे. कित्येक ठिकाणी आमच्याच कार्यकर्त्यांना फोन की आमच्या पंजावर लढा असं सगळीकडं चालतं, हे काही योग्य नाही"

MVA
Bihar Assembly Election 2025: एक्झिट पोल किती खरे ठरले? 'या' एजन्सीनं सांगितला होता सर्वाधिक अचूक आकडा

चुकीचा चष्मा लावायला नको

दानवेंच्या या जहरी टीकेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सपकाळ म्हणतात, लोकसभेच्यावेळी कुठल्याही प्रकराचा चेहरा किंवा कुठलीही घोषणा न होता, महाविकास आघाडीला मोठं यश मिळतं आणि विधानसभेला मिळत नाही याचे जर संदर्भ आपण तपासून बघितले तर ते वेगवेगळे आढळून येतील. तुर्तास या संदर्भाच्या अनुषंगानं या निवडणुकीकडं महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या तीन पक्षांचा चष्मा लावून बिहारच्या निकालाकडं बघणं हे चुकीचं आहे.

MVA
Bihar Election : बिहारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा सुपडासाफ; 14 उमेदवारांना मिळाली धक्कादायक मते

मविआत मिठाचा खडा?

तसंच दानवे यांना इशारा देताना काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी म्हटलं की, "अंबादास दानवे परिस्थिती समजून तुम्ही वागलं पाहिजे. हा जो बिहारमधला विजय आहे तो नितीश कुमारांचा नाही तर ज्ञानेश कुमारांचा आहे. निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं भाजपसाठी काम करत आहे त्यावरुन जर आपण राजकीय विश्लेषण करत गेलो तर महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडू शकतो. आता वस्तुस्थितीचा विचार केला तर विधानसभा निवडणुकीत ज्या जागा तुम्ही भांडण करुन प्रतिष्ठेच्या करुन घेतल्या तिथं कितीतरी ठिकाणी तुमचं डिपॉझिट जप्त झालं आहे.

तसंच त्यातले कितीतरी उमेदवार हे भाजपत आणि शिंदे सेनेत निघून गेलेले आहेत. त्यामुळं आम्ही तुम्हाला बोलणं आणि तुम्ही आम्हाला बोलणं हे टाळून ज्या प्रमाणं मतचोरी होत आहे, त्याचप्रकारे सरकार चोरलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीनं हे आपण थांबवलं पाहिजे, हे थांबवून आपण लोकशाही वाचवली पाहिजे. याकडं आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, आपण अंबादास दानवे, ही वस्तुस्थिती आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com