Former MLA Attacked : राष्ट्रीय नेत्यांवर जीवघेणा हल्ला; एक, दोन नव्हे तर 70 राउंड फायर....

Bihar Crime News : माजी आमदार अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतानाच ही गोळीबाराची घटना घडली. ही घटना हेमजा गावात घडली. बिहारमधील कुख्यात गुंड सोनू-मोनूच्या टोळीकडून सिंह यांच्या ताफ्यावर बुधवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला.
Firing
Firing Sarkarnama
Published on
Updated on

Bihar News : एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बुधवारी (ता.22) राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरले. अशातच आता बिहारमधून (Bihar) मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. छोटे सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले माजी आमदार अनंत सिंह यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. त्यांच्या वाहनावर 60 ते 70 राउंड फायर करण्यात आले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

माजी आमदार अनंत सिंह हे मोकामा विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतानाच ही गोळीबाराची घटना घडली. ही घटना हेमजा गावात घडली. बिहारमधील कुख्यात गुंड सोनू-मोनूच्या टोळीकडून सिंह यांच्या ताफ्यावर बुधवारी अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेत सिंह थोडक्यात बचावले. पण ताफ्यातील एक जण गंभीर जखमी झाला.

मोकामा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेल्या अनंत सिंह हे नौरंगा जलालपूर गावात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी आले होते. याचदरम्यान,त्यांच्या वाहनावर 60 ते 70 फायर करत अवघ्या काही मिनिटांत सोनू-मोनू टोळीने झाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. सिंह आणि या टोळीत याआधीही बऱ्याचदा खटके उडाले आहेत.

Firing
Jalgaon Railway Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबई लोकलमधला 32 वर्षांपूर्वीचा 'तो' अपघात आला पुन्हा चर्चेत..!

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाचं वातावरण आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू-मोनू टोळीकडून गावातील एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली होती. तसेच या कुटुंबालाही घराबाहेर काढले होते. हे प्रकरण समजल्यानंतर माजी आमदार अनंत सिंह गुंडाच्या घरी गेले. त्यावेळी बाहुबली नेते असलेल्या सिंह यांना पाहून सोनू मोनू या भावांनी त्यांना पाहता क्षणी अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि त्यांनी पळ काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com