Patna News : राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसशी असलेली आघाडी तोडत मुख्यमंत्री नितीश कुमारांनी भाजपशी हातमिळवणी केली, पण आता त्यांना आज अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. बहुमत चाचणीसाठी काही मिनिटांचा कालावधी उरलेला असताना अजूनही जवळपास चार आमदार गायब असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच उपमुख्यमंत्र्यांनीच ‘खेला हो गया’, असं सूचक विधान केल्याने खळबळ उडाली आहे. (Bihar floor test)
सरकार वाचवण्यासाठी नितीश कुमारांना (Nitish kumar) किमान 122 आमदारांचे संख्याबळ लागणार आहे. जेडीयू, भाजप व इतर मित्रपक्षांचे मिळून 128 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे, तर आरजेडी व काँग्रेसकडे (Congress) 114 आमदार आहेत. पण बहुमत चाचणीआधी आरजेडीकडून सरकारकडे बहुमत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याला कारणही तसेच आहे.
भाजप व जेडीयूचे प्रत्येकी दोन आमदार अजूनही सभागृहात पोहाेचले नसल्याची चर्चा आहे. असे असले तरी जेडीयूचे संख्याबळ 124 वर येते, पण प्रत्यक्ष मतदानावेळी काहीही घडू शकते, असा दावा विरोधकांकडून केला जात असल्याने नितीश कुमार यांचे टेन्शन वाढले आहे. त्याचप्रमाणे आरजेडीचे आमदार चेतन आनंद यांनीही काल नितीश कुमारांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बहुमत चाचणीआधी मीडियाशी बोलताना उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी ‘खेला हो गया’, असे विधान केले आहे. मात्र, नेमका कुणाला ‘खेला’ होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. विधानसभेत बारा वाजण्याच्या सुमारास बहुमत चाचणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी राज्यपालांचे अभिभाषण होईल.
सरकारकडून विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावाचे काय होणार, यावरच सरकारचे बहुमत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी हे आरजेडीचे आहेत. त्यामुळे त्यांना हटवणे, हे सरकारपुढील पहिले आव्हान असणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.