Nitish Government Floor Test : बिहारमध्ये सत्तानाट्य रंगले, प्लोअर टेस्टपूर्वी पोलिस तेजस्वी यादव यांच्या घरी

Bihar Floor Test Live Updates : बिहार विधानसभेत नितीश कुमार यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत, याची काळजी सगळ्याच पक्षांकडून घेण्यात येत आहे.
Tejaswi Yadav
Tejaswi Yadav Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात आजचा दिवस (सोमवार) महत्त्वाचा आहे. महाआघाडीची साथ सोडून भाजपसोबत गेलेल्या नितीश कुमार यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच रात्री उशिरा पोलिस आरजेडीचे नेता तेजस्वी यादव यांच्या घरी पोहाेचले. त्यामुळे एकच खबळबळ उडाली.

आरजेडीचे आमदार चेतन आनंद हे किडनॅप झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती. मात्र, चेतन आनंद यांनी मी स्वखुशीने येथे आलो आहे , असे सांगितल्याने पोलिसांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. (Nitish Government Floor Test )

Tejaswi Yadav
Bihar Politics : फ्लोअर टेस्टपूर्वी नितीशकुमारांचं टेन्शन वाढलं, 3 आमदार गायब; गडबड होणार?

बिहार विधानसभेत नितीश कुमार (Nitish Kumar) यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे आमदार फुटू नयेत, याची काळजी सगळ्याच पक्षांकडून घेण्यात येत आहे. आरजेडी नेता तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षातील आमदारांना स्वतःच्याच घरी ठेऊन घेतले, तर भाजप (BJP)आणि जेडीयूमधील आमदार हाॅटेलमध्ये थांबले आहेत. 243 आमदार असणाऱ्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी 122 आमदारांची आवश्यकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्तेत सहभागी भाजपकडे 78 तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत. या आमदारांची संख्या बहुमतापेक्षा अधिक म्हणजे 123 होते. मात्र, कालपासून जेडीयूमधील दोन आमदारांचे फोन स्वीच ऑफ येत असल्याने नितीश कुमार यांचे टेन्शन वाढले आहे. सत्तेतील सहभागी जीतन राम मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. मात्र, मांझी नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐनवेळी ते काय निर्णय घेणार, यावरदेखील प्लोअर टेस्टमध्ये नितीश कुमार यांचे भवितव्य ठरणार आहे.

बैठकीला आमदार गैरहजर

नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.11) रात्री बैठक झाली. या बैठकीत जेडीयूचे तीन ते चार आमदार गैरहजर असल्याचे मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. गैरहजर असलेल्या आमदारांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू होते. सोमवारी सकाळी दोन जणांशी संपर्क झाल्याचे सांगण्यात येत आहे.

R

Tejaswi Yadav
Shivsena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना दिलासा देणार? आमदार अपात्रताप्रकरणी आज सुनावणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com