"दारु आणि दारुड्यांना शोधून काढा": शिक्षकांवर आता नवी जबाबदारी

Bihar Governemnt | Drink Policy | सरकारच्या निर्णयावर शिक्षकांची सडकून टीका
Liquor
Liquor Sarkarnama
Published on
Updated on

बिहार : बिहारमध्ये सध्या दारुबंदी कायदा लागू आहे. मात्र त्यानंतरही लपून-छपून दारुची विक्री सुरु असल्याचे दिसून येते. त्यामुळे तळीरामांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने दारु उपलब्ध होतेच. त्याचवेळी राज्यात विषारी दारुच्या घटना देखील समोर येत आहेत. यावर आता बिहार सरकारने (Bihar Government) काही कडक पावलं उचलण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून छुप्या दारुला प्रतिबंध करण्यासाठी सरकारने आज एक नवीन आदेश काढला आहे.

बिहारमधील नितीश कुमार सरकारने दारु आणि दारुडे अशा सगळ्यांना शोधून काढण्याची आणि त्यांची माहिती दारु प्रतिबंधक विभागाला देण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे. यासाठी सरकारकडून खास एक नोटिफिकेशन देखील काढण्यात आलं आहे. सोबतचं शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय कुमार यांनी राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्या सर्वांसहित अन्य अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे.

Liquor
"होय मी लाभार्थी" : महाराष्ट्रात ट्रोल झालेल्या वाक्यावर भाजपची गोव्यात जाहिरातबाजी

या पत्रात म्हटले आहे की, दारुबंदीनंतरही राज्यात अजूनही काही लोक छुप्या पद्धतीने दारूचे सेवन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हा प्रकार रोखणे गरजेचे आहे. त्यामुळे या संदर्भात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण समितीची बैठक घेऊन व्यसनमुक्तीबाबत आवश्यक माहिती द्यावी. याशिवाय शाळेची दिवसभराची वेळ संपल्यानंतर दारुडे शाळा आणि विद्यालय परिसरांना आपला छुपा अड्डा बनवणार नाहीत, याचीही काळजी घेण्याचे निर्देश शिक्षकांना देण्यात आले आहेत.

Liquor
राऊत शब्दाचे पक्के; उत्पल पर्रीकरांचा अर्ज वैध ठरताच घेतला मोठा निर्णय

दरम्यान, बिहारमधील शिक्षकांनी नितीश कुमार सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचेही शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे. शिक्षकांच्या मतानुसार दारु आणि दारुड्यांशी दुष्मनी निष्पाप शिक्षकांनी का घ्यावी? तसेच जर सगळीच काम शिक्षक करणार असतील तर न्यायालय, पोलिस स्टेशन, रस्ते, इमारती, पूल या गोष्टींच्या बांधकामाची, वीज विभाग, अग्निशामन या विभागांची काम देखील शिक्षकांना का दिली जात नाहीत? असा सवाल विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com