Bihar Lok Sabha Election: बिहारमध्ये भाजप राम भरोसे तर उमेदवार मोदी भरोसे..!

Darbhanga Lok Sabha Constituency : उमेदवारांनी स्वतःची प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबविण्याऐवजी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर विसंबून राहणे सुरू केले आहे. यामुळे भाजपमध्ये चिंता वाढली आहे.
Narendra Modi - Bihar
Narendra Modi - BiharSarkarnama

Patana News : पाच वर्षापूर्वी बिहारमध्ये मोठे यश लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने मिळविले होते. बिहारमधील 40 पैकी 39 जागा मोदी यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्यात आल्या होत्या. या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची तयारी महायुतीने केली असली तरी पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेले मतदान आणि कार्यकर्त्यांमध्ये वाढलेली उदासीनता भाजपमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे बिहारमधील भाजप राम मंदिराच्या मुद्द्यावर तर उमेदवार मोदी यांच्या करिष्यावर अवलंबून आहेत. ही दरभंगा लोकसभा मतदार संघातील दिलाही गावातल्या प्रचारातील सहभागी भाजप कार्यकर्त्याची प्रतिक्रिया महत्वपूर्ण ठरणारी आहे.

बिहारमध्ये (Bihar) मोठ्या प्रमाणात उन्हाळा जाणवत आहे. भर दुपारी 42 अंश सेल्शिअस तापमानात जोरदार आवाजात प्रचाराची गाणी सुरू असतात. दरभंगा लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे विद्यमान खासदार गोपालजी ठाकूर उमेदवार आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाने याच भागातील दरभंगा ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे ललितकुमार यादव यांना उमेदवारी दिली आहे. आठ वेळा या मतदारसंघातून यादव आमदार राहिले आहेत. या मतदारसंघात साडेचार लाखाच्या आसपास ब्राह्मण मते आहेत. तर राष्ट्रीय जनता दलाच्या एमवाय समीकरणातील यादव मते तीन लाख आणि मुस्लिम मते तीन लाखाच्या आसपास आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi - Bihar
Loksabha Election 2024 : रोहिणी आचार्यांमुळे लालू यादव यांची प्रतिष्ठा पणाला

या मतदारसंघात अतिमागास जातींच्या मतदारांचे प्रमाणही मोठे आहे. दरभंगा येथे एम्सला मिळालेली मंजुरी, विमानतळ यासारख्या विकासाच्या मुद्द्यावर भाजपचा प्रचार सुरू आहे. मात्र असे असले तरी येथील मतदानाला हिंदू मुस्लिम या धार्मिक ध्रुवीकरणाची किनार देखील राहिली आहे. या भागातील मुद्दे आणि प्रचाराचा परिणाम जवळच्या मधुबनी, झंझारपूर, उजियारपूर आणि समस्तीपूर या चारही लोकसभा मतदार संघांवर होत असतो.या भागामध्ये भाजपचा प्रमुख मुद्दा असलेल्या अयोध्येतील राममंदिराची, हिंदुत्वाच्या मुद्द्याची फारशी चर्चा नसणे याबाबतची अस्वस्थता भाजपमधूनच व्यक्त होत आहे

मतदारांना मतदान (Voting) केंद्रापर्यंत नेण्याची महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उदासिनता वाढली आहे. सर्व उमेदवारांनी स्वतःची प्रचारयंत्रणा प्रभावीपणे राबविण्याऐवजी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर विसंबून राहणे सुरू केले आहे. यामुळे भाजपमध्ये चिंता वाढली आहे. मतदार संघातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो, अशी चिंता वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. पूर्वी पक्षाचे नेते कुठेही गेल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांना आवर्जून भेटायचे. आता नेते कार्यकर्त्यांमधील अंतर चिंताजनक पातळीवर वाढले असल्याचे निरिक्षण या पदाधिकाऱ्यांनी नोंदविले.

(Edited by : Chaitanya Machale)

Narendra Modi - Bihar
Belgaum Lok sabha Constituency : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यापुढे भाजपचा बालेकिल्ला वाचविण्याचे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com