Belgaum Lok sabha Constituency : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यापुढे भाजपचा बालेकिल्ला वाचविण्याचे आव्हान

Lok Sabha Election 2024 : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील लिंगायत समाजाचे प्राबल्य पाहून काँग्रेसने महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल रवींद्र हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत प्रथमच भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे.
Mrunal Hebbalkar-Jagadish Shettar
Mrunal Hebbalkar-Jagadish ShettarSarkarnama

Belgaum, 2 May : महाराष्ट्र-कर्नाटक वादाचा केंद्रबिंदू आणि मराठी अस्मिता जागृत ठेवणारा बेळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपचा गेली 20 वर्षे बालेकिल्ला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत विद्यमान खासदारांवरील असंतोष टाळण्यासाठी बेळगावमधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मतदारसंघातील लिंगायत समाजाचे प्राबल्य पाहून काँग्रेसने महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र मृणाल रवींद्र हेब्बाळकर यांना तिकिट दिले आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांत प्रथमच भाजपपुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे.

बेळगाव लोकसभा मतदारसंघ (Belgaum Lok sabha Constituency ) हा महाराष्ट्र एकीकरण समितीमुळे कायम चर्चेत राहिलेला आहे. येथील लोकसभेची लढाई कायमच लक्षवेधी ठरली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) सुरेश अंगाडी हे 2004 पासून आजपर्यंत कायम निवडून आले आहेत, मात्र. मागील निवडणुकीत आंगडी यांचा निसटता म्हणजे अवघ्या पाच हजार मतांनी विजय झाला होता. मागील 2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार नसता तर कदाचित मागील निवडणुकीतच अंगाडी यांची दांडी गूल झाली आहेत आणि भाजपचे वर्चस्व मोडीत निघाले असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mrunal Hebbalkar-Jagadish Shettar
Latur Lok Sabha Constituency : लातूर पॅटर्नला भंगार म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना भंगारात टाकण्याची वेळ; नाना पटोले संतापले...

अंगाडी यांच्या विरोधात असलेला असंतोष आणि कमी मतांनी मिळालेला विजय, यामुळे अंगाडी यांना उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट हेाते. अंगाडी यांच्या जागी काँग्रेसमध्ये जाऊन आलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांना भाजपने बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दुसरीकडे, भाजपचे शेट्टार यांच्या विरोधात काँग्रेसने युवा नेतृत्व मृणाल हेब्बाळकर (Mrunal Hebbalkar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. हेब्बाळकर हे कर्नाटक राज्य सरकारमधील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र आहेत. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून लक्ष्मी हेब्बाळकर या विधानसभेला निवडून आलेल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना गेल्या निवडणुकीत जोरदार लढत दिली होती. त्याचा फायदा काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांना होण्याची शक्यता आहे.

Mrunal Hebbalkar-Jagadish Shettar
Lok Sabha Election 2024 : 'शरद पवार- उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक'; बावनकुळेंनी डिवचलं!

मराठी भाषिकांचा प्रभाव असलेल्या बळेगाववर महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व राहिलेले आहे. पण, सध्या बेळगावमध्ये एकही आमदार महाराष्ट्र एकीकरण समितीचा नाही. गेल्या 2019 च्या निवडणुकीत एकीकरण सामितीच्या उमेदवाराला तब्बल 1 लाख 17 हजार मते मिळाली होती. त्यामुळे मतदारसंघात मराठी भाषिकांचा मोठा प्रभाव असल्याचे दिसून येते. तसेच, दलित मतदार 12 टक्के आणि मुस्लीम मतदार 11 टक्के आहे. त्यामुळे मराठी भाषिकांबरोबरच हे दोन्ही समाज घटकही बेळगावमध्ये निर्णायक भूमिका बजावणारे आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Mrunal Hebbalkar-Jagadish Shettar
Sharad Pawar News : भाजपशी संधान बांधलेल्या अभिजित पाटलांवर पहिल्यांदाच बोलले शरद पवार; राज्यकर्त्यांना फटकारलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com