Lawrence Bishnoi Threat to Minister : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने मंत्र्याला धमकी; क्यूआर कोड पाठवून मागितली 30 लाखांची खंडणी!

Minister receives death Threat : जाणून घ्या, नेमके कोण आहेत हे मंत्री आणि काय आहे नेमकं प्रकरण? ; वारंवार फोन आणि मेसेज येत असल्याने मंत्री महोदयांनीअखेर साधला पोलिसांशी संपर्क
Lawrence Bishnoi
Lawrence BishnoiSarkarnama
Published on
Updated on

Bihar Minister receives death Threat : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने काही दिवसाआधी अपक्ष खासदार पप्पू यादव यांना धमकी मिळाली होती, मात्र नंतर प्रकरण काही भलतच निघालं होतं. त्यानंतर आता पुन्हा बिहारमध्ये लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली गेल्याचे समोर आले आहे आणि विशेष म्हणजे यावेळी धमकी कुण्या आमदार, खासदाराला नव्हे तर थेट मंत्र्याला दिली गेली आहे.

बिहार सरकारमधील कामगार मंत्री संतोष सिंह यांना धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर खंडणीच्या रक्कमेसाठी क्यूआर कोडही पाठवला गेला, ज्यावर पैसे पाठवण्यास सांगितले गेले. बिहार(Bihar) सरकारमधील कामगार मंत्री संतोष कुमार सिंह यांना कुणीतरी फोन करून लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली. आतापर्यंत हा धमकीचा फोन नेमका कुणी केला होता, याचा शोध लागलेला नाही. मात्र मंत्री संतोष कुमार सिंह यांनी याबाबत बिहारचे डीजीपी विनय कुमार यांना माहिती दिली आहे. त्यानंतर आता पोलिस या प्रकरणाच्या तपासाला लागले आहेत.

मंत्री संतोष कुमार यांना ज्या नंबरवरून फोन येत होता, भारताबाहेरचा नंबर असल्याची माहिती समोर आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्यांना धमकी दिली की, जास्त शहाणे बनताय, ३० लाख रुपये द्या नाहीतर चांगलं होणार नाही. यावर मंत्री संतोष कुमारही चिडले आणि म्हटले की जे करायचं ते कर, मी कुणालाही घाबरत नाही. एवढं बोलून फोन कट केला.

Lawrence Bishnoi
PM Modi News : 'मी पण गच्चीवर जाऊन पतंग उडवायचो...' मोदींनी दिला आठवणींना उजाळा!

मात्र फोन करणाऱ्याने त्यांना पुन्हा त्रास देणं सुरूच ठेवलं. एकामागोमाग अनेक फोन येत होते आणि मेसेज येत होते. अखेर प्रकरणाचं गांभीर्य पाहून मंत्री संतोष कुमार यांनी याबाबत डीजीपी यांना माहिती दिली.

Lawrence Bishnoi
Poultry Crisis in Goa : गोव्यात उद्भवला 'बॉयलर चिकन' तुटवड्याचा प्रश्न, आता महाराष्ट्रातील 'हा' आमदार घालणार लक्ष!

याआधी बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव(Papu Yadav) यांनाही धमकी मिळाली होती. पूर्णिया मतदारसंघाचे अपक्ष खासदार पप्पू याद यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. यामुळे पप्पू यादव सरकारवर चिडले होते आणि त्यांनी आपल्यासाठी सुरक्षेचीही मागणी केली होती. मात्र याबाबत पोलिसांनी जेव्हा सखोल चौकशी केली तेव्हा भलतचं समोर आलं. कारण, हे प्रकरण प्रत्यक्षात लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित नव्हतंच, तर खासदारा सुरक्षा व्यवस्था मिळावी यासाठी हे सगळं केलं गेल्याचं समोर आलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com