Patna News : बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव हे आपल्या सडेतोड विधानांसाठी ओळखले जातात. त्यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला खुले चॅलेंज दिले होते. त्यानंतर आता त्यांनी थेट मुंबई येण्याचे सुतोवाच केले आहे.
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोईचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही लिंक पुढे आल्यानंतर पप्पू यादव म्हणाले होते की, कायद्याने परवानगी दिली तर 24 तासांत बिश्नोईसारख्या गुन्हेगारांचे पूर्ण नेटवर्क संपवून टाकेन.
यादव यांच्या या विधानाबाबत नुकतेच एका पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर ते संतापले होते. पत्रकारांना त्यांनी म्हटले होते की, मी आधीच तुम्हाला म्हणालो होतो, असेल फालतू प्रश्न विचारू नका. मला जे बोलायचे होते ते ट्विट केले होते. आता जे बोलायचे आहे ते मुंबईत बोलेन. मी जाणार आहे, 24 तारखेला बोलेन.
ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत पप्पू यादव हे 24 तारखेला मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यांनी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढली आणि जिंकलीही. पण ते काँग्रेसचे नेते आहे. निवडणुकीआधीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता यादव मुंबईत आल्यानंतर बाबा सिद्दिकी यांची हत्या, बिश्नोई गँगवर काय बोलणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
बाबा सिद्दिकी यांची हत्या महाराष्ट्रातील महाजंगलराजचे प्रमाण आहे. बिहारच्या मुलाची हत्या अत्यंत दु:खद घटना आहे. भाजप आघाडीचे सरकार आपल्या नेत्यांची सुरक्षा करू शकत नाही. मग सामान्य लोकांचे काय होईल, अशी टीका यादव यांनी केली होती.
यादव यांनी रविवारी एक ट्विट करत मुंबईत येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सगळ्यांना औकाद दाखवीन, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा इशारा नेमका कुणासाठीही याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाबा सिद्दिकी हे मुळचे बिहारचे होते. त्यांच्या हत्येनंतर यादव यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.