Election Update : आता निवडणूक लढण्यासाठी मुलांच्या संख्येची अट बदलणार; कोण करतंय नवा कायदा?

Local Body Election Chandrababu Naidu : दक्षिणेकडील राज्यांत ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली असून त्याचा विपरित परिणाम होईल, असे विधान चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.
Local Body Election
Local Body ElectionSarkarnama
Published on
Updated on

Andhra Pradesh News : निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला दोनपेक्षा अधिक अपत्य असू नयेत, असा नियम आहे. दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर उमेदवारी अर्ज दाखल करता येत नाही. निवडून आल्यानंतर तिसरे अपत्य झाल्यास निवड रद्द होऊ शकते. पण आता या नियमांत बदल करण्याच्या हालचाली देशातील एका राज्यांत सुरू आहेत.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी निवडणूक लढण्यासाठी असलेली मुलांची अट बदलण्याची तयारी सुरू केली आहे. दक्षिण भारतातील राज्यांमधील लोकांनी अधिकाधिक मुले जन्माला घालावीत, असे विधान त्यांनी केले आहे. या राज्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाडू लागली असून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

Local Body Election
Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीत बिघाडीची चिन्हं ; 'RJD'ने जागा वाटपावर नाराजी दर्शवत घेतली मोठी भूमिका

आपले सरकार दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या कुटुंबाना प्रोत्साहन देण्याचा विचार करत असल्याचेही चंद्राबाबूंनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक नवीन कायदा आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. या कायद्यानुसार आंध्र प्रदेशात दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या लोकांनाच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येऊ शकतील, अशी माहिती नायडू यांनी दिली.

अधिक मुले असलेल्या कुटुंबाला अधिक सरकारी फायदे देण्याचा विचार केला जात आहे. आतापर्यंत दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना निवडणूक लढता येत नव्हती. आंध्र प्रदेशातून हा नियम हटवला जाणार असून त्याजागी नवीन कायदा आणला जाणार आहे.

Local Body Election
MVA Seat Sharing : दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक; ठाकरे सेना विदर्भातल्या चार जागांसाठी आग्रही

आपल्या भूमिकेचे समर्थन करताना नायडू म्हणाले, चीन आणि जपानसह यूरोपातील अनेक देशांना ज्येष्ठ नागरिकांची समस्येचा सामना करावा लागत आहे. 2047 पर्यंत आपली लोकसंख्या अधिक असेल. पण आंध्र प्रदेशसह दक्षिण भारतातही ज्येष्ठ नागरिकांची समस्या आतापासून जाणवत असल्याचे चंद्राबाबूंनी सांगितले.

दक्षिण भारतात जन्मदर 1.6 एवढा असून राष्ट्रीय जन्मदर 2.1 इतका आहे. अनेक गावांमधील युवक शहराकडे स्थलांतरित होत असल्याने खेडेगावांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची समस्या अधिक वाढत चालली आहे. अनेक गावांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक राहत असल्याकडेही चंद्राबाबूंनी लक्ष वेधले.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com