

Bihar News : बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांच्या मतदानाचा दुसरा टप्पा मंगळवारी (ता.11) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यात 65 टक्के मतदान झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 67 टक्के एवढं मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचं (Bihar Assembly Election) दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच एक्झिट पोलचे धक्कादायक अंदाज समोर येत आहेत. यात बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार 'राज' पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोदींचा हनुमान अशी ओळख सांगणार्या चिराग पासवान यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
बिहार विधानसभा निवडणुकांसाठीचं दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध ओपिनियन पोलचे अंदाज समोर आले आहेत. यात भाजप आणि नितीश कुमारांच्या (Nitish Kumar) जनता दल युतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं या पोलमधून अंदाज व्यक्त केला जात आहे. या एक्झिट पोलमधून बिहारच्या जनतेचा नेमका कौल एनडीए आघाडी की महागठबंधनला मिळणार, कोणाची सत्ता येणार, प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला किती जागा मिळणार,चिराग पासवान यांच्या पक्ष किती जागा जिंकणार या सर्वांचा अंदाजे कौल समोर आला आहे.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढवले गेलेल्या एनडीएची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे असल्याचं 'एक्झिट पोल'चे आकडे सांगत आहेत. नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेड पक्षालाही दिमाखदार यश मिळताना पाहायला मिळत आहे. बिहार निवडणुकीची मतमोजणी होणार असून त्याचदिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.
बिहार विधानसभेच्या 2020 मधील निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाने केवळ 43 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपनं 74 जागा जिंकल्या होत्या.पण यंदाच्या निवडणुकीत चित्र बदलणार असल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत Matrize-IANS एक्झिट पोलनुसार जदयूला 65 ते 75 जागा, चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार 52 ते 57 जागा तर Matrize-IANS एक्झिट पोलनुसार भाजपला 65 ते 73 जागा तर, चाणक्यच्या आकडेवारीनुसार भाजपला 70 से 75 जागा जिंकता येतील, असा अंदाज बांधला जात आहे. त्याचमुळे यंदाच्या निवडणुकीत एक्झिट पोलनुसार नितीश कुमारांचं जोरदार कमबॅक होणार असल्याचंच चित्र दिसून येत आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘हनुमान’ म्हणवणारे चिराग पासवान आणि त्यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी (LJP) यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसणार असल्याची माहिती एक्झिट पोलमधून समोर येत आहे. एनडीएच्या जागा वाटपात चिराग पासवान यांच्या पक्षाला 29 जागा देण्यात आल्या आहेत. मात्र अंदाजानुसार, एलजेपीला केवळ 4 ते 5 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.