Bihar News, 16 Mar : संपूर्ण देशभरात होळीचा सण साजरा केला जात असतानाच बिहारमधून असा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांनी वर्दीत एका पोलिस शिपायाला नाचायला भाग पाडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे नाचला नाही तर तुला निलंबित करून अशी धमकीच तेज प्रताप (Tej Pratap Yadav) यांनी या शिपायाला दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
दरम्यान तेज प्रताप यांच्या सांगण्यावरून नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी (Bihar Police) त्या शिपायावरच कारवाई केली आहे. कारवाई करण्यात आलेल्या पोलिसाचं नाव दीपक कुमार असं आहे. त्याला आता आमदार तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून हटवण्यात आलं आहे.
होळीच्या (Holi) दिवशीचा बिहारमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार तेज प्रताप यादव एका पलिस शिपायाला म्हणतात आता मी एक गाणं वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावं लागेल. नाचला नाहीस तर तुला निलंबित करेन. अशी धमकी दिल्यानंतर तो पोलिस शिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर नाचताना दिसत आहे.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बिहारसह देशातील राजकारण तापलं आहे. अनेकांना यावरून तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली आहे. जनता दल (यु) पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी, अशा कृत्यांना बिहारमध्ये थारा देऊ नये.
राज्यातील जंगलराज संपला आहे. पण लालू यादव यांचे युवराज पोलिसाला नाचण्यासाठी धमकी देत आहेत. मात्र, लालू यादव यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असू द्या, त्यांनी आता बिहार बदलला आहे हे लक्षात ठेवावं. तर भाजपचे (BJP) प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी देखील बाप तसा बेटा म्हणत लालू यादव यांच्या कार्यकाळावर टिका केली आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.