Shivsena UBT : मुंबईत 'ते' बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना घरं नाकारतात; त्यावर 'मटण'वाले 'बाल हिंदुहृदयसम्राट' बोलणार का? ठाकरे गटाने राणेंना डिवचलं

Nitesh Rane Mutton Certification : मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांसाठी मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली जाणार असून त्याद्वारे हिंदूंची मांस विक्री करणारी दुकानं उघडली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय हिंदूंनी हे सर्टिफिकेट असलेल्या दुकानांमधूनच मटण खरेदी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Nitesh Rane, Mangalprabhat Lodha
Uddhav Thackeray, Sanjay Raut, Nitesh Rane, Mangalprabhat LodhaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 16 Mar : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मटण दुकानांसाठी मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली जाणार असून त्याद्वारे हिंदूंची मांस विक्री करणारी दुकानं उघडली जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय हिंदूंनी हे सर्टिफिकेट असलेल्या दुकानांमधूनच मटण खरेदी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात हलाल विरुद्ध झटका मटणाचा वाद चांगलाच पेटला आहे. विरोधकांनी राणेंच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर हा निर्णय म्हणजे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याची टीका ही विरोधकांनी केली आहे.

महत्वाची बाब म्हणजे मात्र, नितेश राणेंच्या भूमिकेला नाशिकच्या खाटीक समाजाने देखील तीव्र विरोध करत खाटीक समाजाने हलाल मटण विकण्याचा निर्णय घेतला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आणि राज्यात सुरू असलेल्या 'हलाल' विरुद्ध 'झटका' मांस वादावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) आणि भाजपवर सडकून टीका केली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक या सदरातून राणेंवर हल्लाबोल केला आहे. रोखठोकमधून त्यांनी भाजपचे मंत्री हिंदु-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. तर मोदी शाह एक दिवस जाणारच आहे, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील.

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Nitesh Rane, Mangalprabhat Lodha
Terrorist Abu Katal : भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा! यात्रेकरूंच्या बसवर हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानातच ठार

गेल्या दहा वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राज्य निर्माण झाली आहेत. हे वातावरण फाळणीसदृश्य असून शिवरायांचा इतिहास बदलणे आणि हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारतातला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत असल्याचं राऊत यांनी म्हटलं आह. यावेळी त्यांनी मटणावर सुरू असलेल्या वादावर देखील भाष्य केलं आहे.

त्यांनी लिहिलं, मुसलमानांबरोबर आम्ही नांदणार नाही, असे विष भाजपच्या (BJP) विचारधारेचे लोक उघडपणे पसरवत आहेत. तसा त्यांचा उघड प्रचार चालला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे जाहीरपणे सांगितलं की, हिंदू आणि मुसलमानांचा डीएनए एकच आहे. हिंदू-मुसलमानांनी एकत्र राहायला हवे.

Uddhav Thackeray, Sanjay Raut, Nitesh Rane, Mangalprabhat Lodha
Gulabrao Patil: भाजप, राष्ट्रवादी नव्हे तर जयंतराव आमच्याकडे येणार; शिवसेना मंत्र्यांच्या दाव्यानं खळबळ

ते पहिल्यापासूनच एकत्र आहेत, पण संघ विचाराशी नव्याने जोडलेल्या लोकांना हा विचार मान्य नाही. मंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्रात हिंदूंसाठी व मुसलमानांसाठी स्वतंत्र मटणाची दुकाने निर्माण करण्याचे जाहीर केलं हे भागवत यांना मान्य आहे काय? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राणेंसह संघावर निशाणा साधला.

नवे मटण हृदयसम्राट

दरम्यान यावेळी त्यांनी नितेश राणेंना नवे नवे मटण हृदयसम्राट ही पदवी देत त्यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रात हिंदूंसाठी मटणाची वेगळी दुकाने, पण मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूंना त्यांच्या गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत व जागा नाकारल्या जात आहेत.

त्यावर हे 'मटण'वाले 'बाल हिंदुहृदयसम्राट' बोलणार आहेत काय? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित करत त्यांनी मुंबईत मटण खाणाऱ्यांना काही अपार्टमेंटमध्ये घरे नाकारली जातात याकडे देखील लक्ष वेधलं. त्यामुळे राऊतांच्या या रोखठोक लेखणीवर भाजप आणि मंत्री राणे काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com