Bihar Political News : पलटी नितीश कुमारांची अन् भाजपकडून ‘खेला’; तीन आमदारांना फोडले

Congress MLA Joins BJP : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबत जात इंडिया आघाडीला धक्का दिला. त्यानंतर भाजपने काँग्रेस आणि आरजेडीला धक्का दिला आहे.
Tejashwi Yadav, Nitish Kumar
Tejashwi Yadav, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : मागील महिन्यात बिहारचे (Bihar Political News ) मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना उद्देशून ‘अभी तो खेल शुरू हुआ है’, असा सूचक इशारा दिला आहे. पण बहुमत चाचणीवेळी आरजेडीचेच तीन आमदार विरोधी बाकांवर बसल्याने चर्चांना उधाण आले. त्यानंतर काही दिवसांतच भाजपने आरजेडीसह काँग्रेसलाही धक्का दिला आहे.

बिहारमध्ये काँगेसचे (Congress) दोन आणि आरजेडीच्या एका आमदाराने आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे आमदार मुरारी गौतम आणि सिध्दार्थ सौरव तर आरजेडीच्या आमदार संगीता देवी या भाजपमध्ये (BJP) दाखल झाल्या. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तोंडावर विरोधकांना धक्का बसला आहे.

Tejashwi Yadav, Nitish Kumar
Rajya Sabha Election 2024 : काँग्रेसच्या हातून उत्तरेतील एकमेव राज्यही जाणार? क्रॉस वोटिंगमधून 'ऑपरेशन लोटस'च्या चर्चेनं खळबळ

राज्यात ठिकठिकाणी सध्या ईडीची छापेमारी सुरू आहे. यापार्श्वभूमीवर तीन आमदारांच्या भाजप प्रवेशाने चर्चांना उधाण आले आहे. बिहारमधील भोजपूर जिल्हायात आरजेडी आमदार किरण देवी यांच्याशी संबंधित काही ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ईडीकडून (ED Raid) मनी लाँर्डिंग प्रकरणाची चौकशी केली जात आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी या प्रकरणात किरण देवी आणि त्यांचे पती माजी आमदार अरूण यादव यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जाते. याच प्रकरणात तेजस्वी यादव यांच्यासह लालू प्रसाद यादव, राबडीदेवी आणि यादव कुटुंबातील काही सदस्यांचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे.

बहुमत चाचणीवेळी बसलेला धक्का आणि त्यानंतर ईडी कारवाई यापार्श्वभूमीवर तीन आमदारांनी भाजपमध्ये झालेल्या तीन आमदारांच्या प्रवेशामुळे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. काँग्रेससह आरजेडीचे आणखी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधी विरोधकांना आणखी धक्के बसू शकतात.

Tejashwi Yadav, Nitish Kumar
Transfer of Police Officers : साडेतीनशे पीएसआय, पीआयच्या इलेक्शन बदल्या; गुन्ह्यांच्या तपासाला लागणार ब्रेक?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com