Transfer of Police Officers : साडेतीनशे पीएसआय, पीआयच्या इलेक्शन बदल्या; गुन्ह्यांच्या तपासाला लागणार ब्रेक?

Pimpari-chinchwad पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अधिकाऱ्यांच्याच का जास्त होताहेत लोकसभा निवडणुकीतून घाऊक बदल्या?
Police Officers
Police Officerssarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : लोकसभा निव़डणुकीमुळे स्वत:च्या जिल्ह्यात तीन वर्षाची टर्म पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीस केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य पोलिस दलात जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात काल (ता.२६) १२९ पीआय (पोलिस निरीक्षक) आणि २१२ पीएसआय (पोलिस उपनिरीक्षक) अशा ३४१ पोलिस अधिकाऱ्यांच्या सामूहिक बदल्या करण्यात आल्या. या तपासाधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे गुन्हे उघडकीस येण्यास ब्रेक बसणार आहे.

पीएसआय आणि पीआय हे गुन्हे तपासाचा कणा समजले जातात. तर, त्यांच्यावरील एसीपी, डीसीपी, सीपी हे ज्येष्ठ पोलिस अधिकारी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. तपासाधिकाऱी तथा आय़ओंच्याच घाऊक बदल्या झाल्याने त्याचा फटका ते काम करीत असलेल्या पोलिस ठाण्यांना काही काळ,तरी बसणार आहे.

कारण बाहेरून नव्या आलेल्या अधिकाऱ्यांना तेथे स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आपले नेटवर्क तयार करण्यास वेळ लागणार आहे.काल बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांत बहूतांश अधिकारी हे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील असल्याने तेथील गुन्हे तपासाला ब्रेक लागणार आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच बदल्यांचे वारे पहिले राज्य पोलिस दलात सुरु झाले.

Police Officers
Pimpari News : हिंदूविषयी वादग्रस्त वक्तव्य : कॉंग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन!

एसीपी, डीसीपी ते ॲडिशनल डीजीपी पातळीपर्यंतच्या ज्येष्ठ आय़पीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यातून झाल्यानंतर हे वारे महसूल विभागात आले. तेथेही तहसीलदारांपासून अतिरिक्त मुख्य सचिवांपर्यंत ज्येष्ठ आय़एएस अधिकारी बदलण्यात आले.काल आणखी काही ज्येष्ठ आयएएस आणि कनिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात २१२ पीएसआय आणि १२९ पीआय आहेत.२१२ मध्ये तीस टक्यांहून अधिक पीआय (७०)हे एकट्या पुणे आणि ३९ हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर, १२९ पीआयमध्येही पीएसआयएवढाच टक्का पुण्याचा आहे. तेथील ४१,तर पिंपरी पोलिस आयुक्तालयातील १३ हे अधिकारी बदलण्यात आले आहेत. त्याचा फटका पुढील काही दिवस या दोन्ही शहरातील गुन्हे उघडकीस न येण्यास बसणार आहे. कारण पुण्यात गुन्हेगारीने मोठे डोके वर काढले असून मोका, एमपीडीए कारवाईचा पॅटर्न तेथे फेल गेलेला आहे.

Edited By : Umesh Bambare

Police Officers
Transfers of Police Officers : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात उपमुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील 31 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com