Bihar Political News : विधानसभा उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; बिहारमध्ये पुन्हा उलथापालथ

Maheshwar Hazari News : महेश हजारी हे संयुक्त जनता दलाचे आमदार असून, त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.
Nitish Kumar
Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच विधिमंडळात बहुमत सिद्ध केले आहे, पण त्यानंतरही बिहारच्या राजकारणात उलथापालथ सुरूच आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष महेश्वर हजारी यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. पक्षप्रमुखांना विश्वासात घेऊन आपण राजीनामा दिल्याचा दावा हजारी यांनी केला असला तरी बिहारच्या राजकारणात पुन्हा तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Bihar Political News)

विधिमंडळ सचिवालयाने हजारी यांनी राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी आज दुपारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते कल्याणपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते मार्च 2021 पासून विधानसभा उपाध्यक्ष होते. नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या पक्षातील ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याने चर्चांना उधाण आले आहे.

Nitish Kumar
Rajya Sabha Election 2024 : भाजपने लोकसभेआधी वाढवलं विरोधकांचं टेन्शन; 15 जागांसाठी होणार निवडणूक

राजीनाम्याबाबत बोलताना हजारी यांनी सांगितले की, मी पक्षप्रमुखांशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता असल्याने माझ्याबाबतीत पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार काम करेन. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडेन, असे हजारी यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, हजारी यांनी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बिहारमधील एनडीए (NDA) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हजारी यांचाही समावेश होऊ शकतो, अशी चर्चा आहे. जातीय समीकरण साधण्यासाठी हजारी यांना मंत्रिपद मिळेल, असा दावा केला जात आहे.    

R

Nitish Kumar
Uttar Pradesh Politics : मोदींना भिडणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या मतदारसंघात 'सपा'ने दिला उमेदवार; 'इंडिया'चं काय होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com