Bihar Politics : नितीश कुमारांना मोठा धक्का; मुख्यमंत्रिपद सोडण्याआधीच बड्या नेत्याची ‘एक्झिट’

KC Tyagi exit JDU : नितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही त्यागी यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, मागील काही महिन्यांत त्यांनी अनेकदा पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका केली होती.
KC Tyagi, Nitish Kumar
KC Tyagi, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar leadership changes news : बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत त्यांचा विजय झाला असून लवकरच वरिष्ठ सभागृहाच्या सदस्यत्वाची शपथ घेतील. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्याची तारीखही निश्चित झाल्याची चर्चा आहे.

बिहारमध्ये घडामोडी घडत असतानाच संयुक्त जनता दलाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या के. सी. त्यागी यांनी पक्षातून काढता पाय घेतला आहे. त्यागी हे मागील अनेक वर्षांपासून नितीश कुमार यांच्या कट्टर समर्थक आणि सहकारी राहिले आहेत. ते माजी खासदार असून पक्षात अनेक महत्वाच्या पदांवर जबाबदारी पार पाडली आहे.

पक्षासोबत २३ वर्षे राहिलेल्या त्यागी यांनी यावर्षी सदस्यत्वाची नोंदणीच केली नाही. त्यांनीच याबाबत माहिती दिली. मागील काही महिन्यांपासून ते पक्षामध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच नितीश कुमार मुख्यमंत्रिपद सोडून राज्यसभेत जाणार असल्याने त्यागी यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला आहे.

KC Tyagi, Nitish Kumar
Supreme Court news : कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच! सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, आता ‘तारीख पे तारीख’ नाही...

त्यागी यांनी म्हटले की, माझे नाते आणि संबंध फक्त नितीश कुमार यांच्यासोबतच होते. ते जेडीयूची आत्मा असल्याने मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या निर्णयाने माझ्यासह प्रत्येक कार्यकर्त्याला धक्का बसला आहे. नवे नेतृत्व नितीश कुमार यांच्या सल्लाशिवाय येऊ नये. नितीश कुमार यांनी राजकारणात आणखी मजबूत व्हावे, असेच मला वाटत असल्याचे त्यागी यांनी स्पष्ट केले.

त्यागी यांनी सहावेळा लोकसभेची निवडणूक लढविली आहे. ते राज्यसभेचेही खासदार होते. बिहारमध्ये अनेक वर्षे राजकारण केले असले तरी आता ते जुनी कर्मभूमी असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सक्रीय होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. उत्तर प्रदेशात २०२७ मध्ये विधानसभेची निवडणूक आहे. याबाबत पुढील तीन-चार दिवसांत ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

KC Tyagi, Nitish Kumar
Mamata Banerjee News : निवडणुकीआधीच ममतादीदींचे 75 आमदार फिक्स; 'हा' फॅक्टर ठरणार गेमचेंजर, भाजपसमोर मोठे आव्हान

नितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार म्हणूनही त्यागी यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, मागील काही महिन्यांत त्यांनी अनेकदा पक्षाच्या धोरणांवर उघडपणे टीका केली होती. पक्षातील नेत्यांनी त्याचे खंडनही केले होते. पण नितीश कुमार यांनी त्यावरून त्यागी यांना एकदाही खडेबोल सुनावले नाही की त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली नाही. याबाबत त्यागी यांनी नितीश कुमार यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com