Ravindra Chavan's Criticism : 'महाविकास'ने थांबवलेले काम भाजपने केले पूर्ण; चव्हाणांचे काँग्रेस - राष्ट्रवादीवर टीकास्त्र...

Development Works in Sangli District : अनेक वर्षे प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्याचे काम आपले महायुतीचे सरकार करीत आहे.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSarkarnama
Published on
Updated on

Sangli News : भाजपची सत्ता असताना हरिपूर - कोथळी पुलाचे काम सुरू झाले, परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाणीवपूर्वक पुलाचे काम थांबवले गेले. हा पूल पूर्ण होण्यासाठी पुन्हा भाजपला सत्तेत यावे लागले अन् त्यानंतरच पुलाचे काम पूर्ण झाल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले, तर यावरून काँग्रेस - राष्ट्रवादीवर टीकस्त्र सोडले.

हरिपूर - कोथळी या गावांना जोडणार्‍या कृष्णा नदीवरील पुलाचा लोकार्पण सोहळा बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या वेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार गोपीचंद पडळकर, पृथ्वीराज देशमुख, दीपक शिंदे - म्हैसाळकर, शेखर इनामदार, हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर उपस्थित होते.

Ravindra Chavan
CM Eknath Shinde Birthday : राजकारण विसरून तांबड्या मातीत घाम गाळणारा मुख्यमंत्री...

चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हरिपूर - कोथळी या पुलाचे काम सुरू झाले होते. मधल्या काळात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी पुलाच्या कामात राजकारण आल्याने काम थांबले. कारण देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्यासाठी तो थांबला होता. सध्या महायुतीचे सरकार आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारी कामे पूर्ण करण्याचे काम आपले सरकार करीत आहे. या पुलामुळे सांगली आणि कोल्हापूरचे अंतर कमी झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान मोदी आणि मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांचे जाळे पसरत असताना नवनवीन तंत्रज्ञान वापरून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या सर्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने महामंडळाची स्थापना करण्यात आली, ज्यातून रस्त्यांसाठी ठोस निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये महामंडळच ठेकेदार असेल. म्हणूनच सहा हजार कि.मी.च्या कामाला मंजुरी दिली आहे. सरकार सातत्याने विकासकामे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणारा दुवा पूर्ण झाला. या पुलामुळे दहा किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री जे मागेल ते देत आहेत. सांगलीकडे तुमचे लक्ष असू दे, आम्हाला बांधकामे द्या आणि वारंवार उद्घाटनला या, अशी विनंतीही त्यांनी केली.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, या पुलासाठी 2016 पासून पाठपुरावा करत आहे. यास काहीसा विलंब झाला. मात्र, त्याची अखेर आज फलपूर्ती झाली. या वेळी दिनकर पाटील, नितीन शिंदे, मकरंद देशपांडे, अरविंद तांबवेकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

(Edited by Amol Sutar)

R

Ravindra Chavan
Abhishek Ghosalkar Case : मॉरिस चार दिवसांपूर्वीच 'वर्षा' बंगल्यावर होता, मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटोही समोर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com