Latur Congress Meeting : 'नितीशकुमार हे देशातील सर्वात मोठे 'पलटूराम', त्यांचा...'; काँग्रेस नेत्याचा तिखट वार

Congress Leader Criticize on Bihar CM Nitish Kumar : 'राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष घाबरतोय...'
Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Nitish Kumar, Mallikarjun KhargeSarkarnama
Published on
Updated on

Latur News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा देशभरात सुरु केली आहे. सध्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असून या यात्रेला नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमांना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष घाबरत आहे. यातूनच राहुल गांधी यांची यात्रा अडवणे, त्यांना ठिकठिकाणी प्रवेश नाकारणे असे प्रकार घडवून आणले जात आहेत, अशी टीका अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव व राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे देशातील सर्वात मोठे 'पलटूराम' असून त्यांचा इंडिया आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेस पक्षाची विभागीय बैठक लातूर येथे होत आहे. या बैठकीसाठी चेन्निथला येथे आले होते. बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Rajya Sabha Election 2024 : राज्यातील 6 जागांसाठी निवडणुकीची घोषणा, मविआ अन् भाजपच्या 3-3 जागा

राज्यात पक्षाच्या विभागवार बैठका सुरु आहेत, येथे ही शेवटची बैठक होत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस (Congress) एकजुटीने मैदानात उतरणार आहे असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. 16 व 17 फेब्रुवारी रोजी लोणावळ्यात पक्षाचे शिबिरही होणार आहे. तत्पूर्वी 5 फेब्रुवारपर्यंत जिल्हानिहाय बैठका होणार आहेत.

काँग्रेस नेते चेन्निथला म्हणाले, इंडिया आघाडी देशाला सक्षम धर्मनिरपेक्ष सरकार देऊ इच्छिते. राहुल गांधी यांनी भारत तोडणाऱ्यांना इशारा देत भारत जोडो यात्रा काढली, त्याला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राहुल गांधी यांच्या यात्रा अडवणे, परवानगी नाकारणे असे प्रकार केले जात आहेत. सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत आहे, इंडिया आघाडी सक्षम पर्याय देईल. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करुन निवडणूक लढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न..

राज्यातील 48 जागा जिंकता आल्या पाहिजेत, त्या दृष्टीने महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने कोणाची फसवणूक केली ते सांगावे. या निर्णयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व अजित पवार यांचा सहभाग का नाही हेही सांगावे.

सध्याचे सर्वेक्षण बोगस आहे, मुंबईत तर सहा दिवसांत 27 लाख कुटुंबाचे सर्वेक्षण झाले आहे, त्यांचा तर सत्कारच केला पाहिजे. सध्याचे राज्यातील महायुतीचे सरकार हे लुटारु आहे. शेतकरी, बेरोजगार अशा घटकांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या या सरकारला लोकच बरबाद करतील, असा हल्ला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही यावेळी चढवला.

(Edited By Deepak Kulkarni)

Nitish Kumar, Mallikarjun Kharge
Sanjay Raut News : '...अन्यथा, भाजप एक ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही' ; संजय राऊतांचा हल्लाबोल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com