Lalu Prasad Yadav : विधानसभा निवडणुकीआधीच बिहारच्या राजकारणात ट्विस्ट; लालू प्रसाद यादवांच्या अडचणी वाढणार, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

Bihar Politics : ईडीची याप्रकरणात जानेवारी 2024 मध्ये एन्ट्री झाली होती. त्यानंतर ईडीनं पहिले आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात लालू यादव यांचे कथित सहाय्यक अमित कात्याल, त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारती, दुसरी मुलगी हेमा यादव यांचा समावेश आहे.
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad YadavSarkarnama
Published on
Updated on

Bihar News: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. त्यासाठी जनता दल व राष्ट्रीय जनता दल यांसह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. बिहारच्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. पण आता बिहारच्या निवडणुकीआधीच मोठा ट्विस्ट निर्माण झाला असून लालू प्रसाद यादवांच्या (Lalu Prasad Yadav) अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी पुन्हा वाढणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) कथित जमीन-नोकरी घोटाळ्यात लालू प्रसाद यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे.

ईडीने ऑगस्ट 2024 मध्ये राजदच्या लालू प्रसाद यादव,त्यांचा मुलगा आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए)आरोपपत्र दाखल केले आहे.

 Lalu Prasad Yadav
PM Narendra Modi:'ऑपरेशन सिंदूर' पहिला धमाका; मोदींच्या मनात दुसरंच काहीतरी? गेल्या 40 तासांत मोठ्या हालचाली

सीबीआयने दाखल केलेला हा खटला एफआयआरशी संबंधित आहे. ज्यामध्ये 2004-2009 दरम्यान भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डी रिप्लेसमेंटच्या नियुक्तीमध्ये लालू प्रसाद यादव भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला होता. सीबीआयने नोंदवलेल्या एफआयआरमधून हे प्रकरण उघडकीस आले होते.लालू प्रसाद यादव 2004 ते 2009 या काळात रेल्वेमंत्री असताना रेल्वेमध्ये ग्रुप डी नियुक्त्यांमध्ये भ्रष्टाचार झाला होता.

मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या जनता दल सह भाजपनं आत्तापासूनच बिहारच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बिहारच्या राजकारणात मोठा दबदबा असलेल्या लालू प्रसाद यादव यांनी मोठी तयारू सुरू केली असतानाच आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी ईडीकडून खटला चालवण्याची परवानगी दिल्यामुळे राष्ट्रीय जनता दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तसेच बिहारचं राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.

 Lalu Prasad Yadav
KP Patil News : के.पी. पाटलांचा निर्णय उद्धव ठाकरेच घेणार; पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त!

ईडीची याप्रकरणात जानेवारी 2024 मध्ये एन्ट्री झाली होती. त्यानंतर ईडीनं पहिले आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात लालू यादव यांचे कथित सहाय्यक अमित कात्याल,त्यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मुलगी आणि राज्यसभा खासदार मीसा भारती, दुसरी मुलगी हेमा यादव आणि दोन कंपन्या - एके इन्फोसिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एबी एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड - यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com