
Bihar SIR Update: बिहारमध्ये सध्या सुरु असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्पडताळणी प्रक्रियेला विरोधकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. सध्या याप्रकरणी विरोधकांनी सुप्रीम कोर्टातही धाव घेतली आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुप्रीम कोर्टात या प्रक्रियेतील विविध आक्षेपांवर सुनावणी सुरु आहे. विरोधकांच्या दोन मागण्या सुप्रीम कोर्टानं मान्य करत निवडणूक आयोगाला याबाबत आदेश दिले आहेत.
न्या. सूर्यकांत आणि न्या. जयमाल्या बागची यांच्या खंडपीठानं याप्रकरणी सुनावणी करताना सांगितलं की, ज्या ६५ लाख लोकांची नाव २०२५ च्या मतदार यादीत समाविष्ट होते परंतू आता विशेष सखोल पुनर्पडताळणीच्या प्रक्रियेत ताज्या मतदार यादीतून या लोकांची नावं वगळण्यात आली आहेत. या वगळण्यात आलेल्या नावांची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर सार्वजनिक केली जावी. तसंच ही यादी बुथनिहाय पद्धतीनं सार्वजनिक केली जावी तसंच त्यामध्ये मतदारांचे EPIC क्रमांक देखील असायला हवेत. तसंच त्यांचं नाव मतदार यादीतून का हटवण्यात आलं हे देखील जाहीर करायला हवं.
याशिवाय कोर्टानं म्हटलं की, प्रत्येक बुथस्तरीय अधिकाऱ्याद्वारे संबंधित ग्रामपंचायत भवन किंवा खंड विकास कार्यालयांमध्ये नोटीस बोर्डवर बाहेर मतदारांची बुथवार यादी कारणासह चिकटवावी. कारण जनतेला ही यादी पाहता येईल. तसंच खंडपीठानं निवडणूक आयोगाला म्हटलं की, त्यांनी बिहारमध्ये सर्वाधिक खप असणाऱ्या स्थानिक आणि इंगर्जी वर्तमानपत्रात सार्वजनिक नोटिशीच्या माध्यमातून या प्रक्रियेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करावा. तसंच याला दुरदर्शन आणि आकाशवाणीवर दखील प्रसारित करावं. त्याचबरोबर जर जिल्हा निवडणूक आयोगाचं जर कुठलं सोशल मीडिया अकाऊंट असेल तर त्यावरुन देखील ही यादी शेअर केली जावी.
दरम्यान, निवडणूक आयोगाचे वकील राकेश द्विवेदी यांनी गुरुवारी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, ही यादी बूथ स्तरावरील राजकीय कार्यकर्त्यांना आधीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसंच आता ही यादी ऑनलाईन देखील उपलब्ध करुन दिली जाईल. इलेक्टोरल फोटो आयडेंटीटी कार्ड अर्थात EPIC क्रमांकाच्या माध्यमातून या क्रमांकावरुन सर्वसामान्य जनता आपलं नाव तपासू शकतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.