EVM Recounting : धक्कादायक! भारतात पहिल्यांदाच EVMचा झाला पराभव; सुप्रीम कोर्टात फेर मतमोजणीत हारलेला उमेदवार झाला विजयी

EVM Recounting : देशात सध्या सदोष मतदार याद्यांवरुन घमासान सुरु असताना तसंच ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या घोटाळ्यांची चर्चा सुरु असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
EVM Recounting Supreme Court
EVM Recounting Supreme Court
Published on
Updated on

EVM Recounting : देशात सध्या सदोष मतदार याद्यांवरुन घमासान सुरु असताना तसंच ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनच्या घोटाळ्यांची चर्चा सुरु असताना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. भारतात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांसमोर ईव्हीएम मशिनमधील मतांची पुन्हा मोजणी झाली. या मोजणीमध्ये धक्कादायक निकाल समोर आला. पराभूत झालेल्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळाल्याचं स्पष्ट झालं त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही निवडणूकच रद्द केली.

EVM Recounting Supreme Court
Raj Thackeray on Meat Ban: मांसबंदी करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेला राज ठाकरेंचं थेट आव्हान! कार्यकर्त्यांना दिला 'हा' कार्यक्रम

हरयाणाच्या पानीपत जिल्ह्यातील बुआना लाखू ग्रामपंचातच्या निवडणुकीत हा प्रकार घडला आहे. कारण कोर्टाच्या निरिक्षणाखाली झालेल्या ईव्हीएमच्या पुनः मतगणनेत अपिलकर्त्या उमेदवाराला सर्वाधिक मत मिळाल्याचं सिद्ध झालं. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं ही सरपंचपदाची निवडणूकच रद्दबातल केली. न्या. सूर्यकांत, न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. एन के सिंह यांच्या खंडपीठानं पानीपतच्या उपायुक्तांसह निवडणूक अधिकाऱ्यांना दोन दिवसांत एक अधिसूचना काढून अपिलकर्ता मोहित कुमारला विजयी घोषित करुन त्यांना तात्काळ पदभार स्विकारण्याला परवानगी देण्याचे आदेश दिले.

EVM Recounting Supreme Court
Chhagan Bhujbal : उशिरा मंत्रिपद, सरकारी बंगलाही नाही, ध्वजारोहणाचा मान नाही… भुजबळांवर अन्यायच अन्याय?

सरपंचपदासाठीची ही निवडणूक २ नोव्हेंबर २०२२ मध्ये झाली होती. यामध्ये कुलदीप सिंह या उमेदवाराला निवडणूक आयोगानं विजयी घोषित केलं होतं. या निकालाला मोहित कुमार या प्रतिस्पर्धी उमेदवारानं अतिरिक्त सिव्हील न्यायाधीशांसह निवडणूक न्यायाधिकरणासमोर या निवडणूक निकालाला आव्हान दिलं. त्यामुळं २२ एप्रिल २०२५ रोजी एका मतदान केंद्रावर पुनःमतमोजणीला परवानगी मिळाली.

पण पंजाब आणि हरयाणा हायकोर्टानं १ जुलै रोजी ही परवानगी रद्द केली. अशा प्रकारे दोन न्यायाधिकारांसमोर दाद न मिळाल्यानं मोहित कुमारनं सुप्रीम कोर्टात अपिल केलं. यानंतर ३१ जुलै रोजी सुप्रीम कोर्टानं न्या. सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना सर्व केंद्रांवरील ईव्हीएम सुप्रीम कोर्टातील रजिस्ट्रारसमोर आणण्याचे आदेश दिले.

EVM Recounting Supreme Court
Eknath Shinde : शिंदेंच्या खात्याकडून दोन दिवसांत 500 कोटींची खैरात... 65 स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरीत

या आदेशात कोर्टानं म्हटलं की, रजिस्ट्रार यांनी फक्त वादग्रस्त मतदान केंद्रावरीलच नव्हे तर सर्व केंद्रांवरील ईव्हीएम मशिनमधील मतांची पुन्हा मतमोजणी करतील. तसंच ही मतमोजणी करताना व्हिडिओ शुटिंगही केलं जाईल. तसंच मत पडताळणीवर याचिकाकर्ते आणि प्रतिवादी यांच्या एका अधिकृत प्रतिनिधी तथा वकिलांद्वारे या अंतिम मोजणीवर स्वाक्षऱ्या करतील. कोर्टाच्या या आदेशानुसार रजिस्ट्रार यांनी सर्व केंद्रांवरील ईव्हीएमची पुन्हा पडताळणी केली. यामध्ये अपिलकर्ते मोहित कुमार यांना १,०५१ मतं पडली तर प्रतिवादी कुलदीप सिंह यांना १,००० मत मिळाली. त्यामुळं सहाजिकचं निवडणूक आयोगानं आधी पराभूत म्हणून घोषित केलेला उमेदवार प्रत्यक्षात विजयी झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com