West Bengal Politics : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले पूर्वीश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य...

Lok Sabha Election 2024 : घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनीही 2016 मध्ये लग्न केले. लग्नाच्या नंतर सौमित्र यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुजाता या देखील भाजपमध्ये गेल्या. सौमित्र 2019 ची निवडणूक भाजपकडून लढले.
Saumitra Khan, Sujata Mondal
Saumitra Khan, Sujata MondalSarkarnama

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालमधील निवडणूक तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होत आहे. पश्चिम बंगालमध्ये दीदीची गॅरंटी चालणार की मोदी गॅरंटीची हवा असणार हे चार जूनलाच कळेल. मात्र, सहाव्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील विष्णुपुरी मतदारसंघातील निवडणूक देशामध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

या मतदारसंघांमध्ये पूर्वश्रमीच्या पती-पत्नी असणारे सौमित्र खान विरुद्ध सुजाता मंडल यांच्यात लढत होत आहे. सौमित्र भाजपचे उमेदवार तर, सुजाता या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार आहेत. एकमेकांच्या विरोधात उमेदवार म्हणून असलेल्या या उमेदवारांची प्रेम कहाणी, लग्न आणि घटस्फोट हा प्रवास मोठा रंजक आहे. West Bengal Politics

2010 मध्ये सौमित्र हे काँग्रेसमध्ये Congress होते त्यावेळी त्यांच्या ओळख सुजाता यांच्याशी झाली. सुजाता या एका सरकारी शाळेमध्ये शिक्षिका होत्या. दोघांच्याही ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे सौमित्र यांनी काँग्रेसला रामराम करत 2014 मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसमध्ये TMC प्रवेश केला त्यावेळी सुजाता यांनी देखील तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्यांनी लग्नाचा विचार केला त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला घरून विरोध झाला. Bishnupur Constituency

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घरच्यांच्या विरोधात जाऊन दोघांनीही 2016 मध्ये लग्न केले. लग्नाच्या नंतर सौमित्र यांनी भाजपमध्ये BJP प्रवेश केला. त्यांच्यासोबत सुजाता या देखील भाजपमध्ये गेल्या. सौमित्र 2019 ची निवडणूक भाजपकडून लढले. मात्र, सौमित्र यांना विष्णुपुरी मतदारसंघात येण्यासाठी कोलकता उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. त्यावेळी त्यांच्या प्रचाराची सगळी जबाबदारी सुजाता मंडल यांनी एकहाती संभाळली. सौमित्र खासदार म्हणून निवडूनही आले. मात्र, पुढे दोघांच्यामध्ये खटके उडू लागले. सुजाता यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सौमित्र यांनी सुजाता यांच्याशी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

Saumitra Khan, Sujata Mondal
Shantigiri Maharaj News : नाशिकनंतर शांतीगिरी महाराज आता वाराणसीच्या मैदानात; पंतप्रधान मोदींसाठी...

2019 मध्ये विष्णुपुरी मतदारसंघातून सौमित्र 78 हजार मतांच्या लीडने निवडून आले होते. यंदा त्यांच्या विरोधात त्यांच्या पूर्वश्रमीच्या पत्नी सुजाता यांना तिकीट देत तृणमूल काँग्रेसने मोठा खेळ खेळला आहे. ही आपल्यासाठी मोठी अग्नीपरीक्षा असल्याचे देखील सुजाता यांनी सांगितले आहे. आज (शनिवारी) सहाव्या टप्प्यात विष्णुपुर मतदारसंघात निवडणूक पार पडली. आता येथील मतदार कोणाचे पारडे जड करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Saumitra Khan, Sujata Mondal
Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची 'घरवापसी' ? परब-राऊत धावले मदतीला तर शिरसाटांचे कारवाईचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com