Shantigiri Maharaj News : नाशिकनंतर शांतीगिरी महाराज आता वाराणसीच्या मैदानात; पंतप्रधान मोदींसाठी...

Narendra Modi Varanasi : नाशिकमधून आपल्याला भाजपने उमेदवारी द्यावी, यासाठी शांतीगिरी महाराजांनी प्रयत्न केले. मात्र नियमानुसार ही जागा शिंदे गटाला सुटल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
Shantigiri Maharaj, Narendra Modi
Shantigiri Maharaj, Narendra ModiSarkarnama

Nashik Political News : नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून महायुतीचे टेन्शन वाढवणारे शांतीगिरी महाराज आता पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मैदानात उतरले आहेत. मोदींसाठी प्रचार करणार असल्याने ते आता वाराणसीला जाणार आहेत. राजकीय जीवनात मोदींनी आदर्श मानतो, त्यांना मते मिळवून देण्यासाठी वाराणसीतील आपल्या भक्तांना आवाहन करणार असल्याचे शांतीगिरी महाराजांनी सांगितले आहे. Shantigiri Maharaj News

नाशिकमधून आपल्याला भाजपने उमेदवारी द्यावी, यासाठी शांतीगिरी महाराजांनी Shantigiri Maharaj प्रयत्न केले. मात्र नियमानुसार ही जागा शिंदे गटाला सुटल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात शांतीगिरी महाराजांचा मोठा भक्त परिवार असल्याने नाशिकच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. आता मतदार कोणाला कौल देणार, हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे.

नाशिकचे मतदान पाचव्या टप्प्यात झाल्याने आता शांतीगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींसाठी Narendra Modi प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. वाराणसीचे मतदान सातव्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी ते वाराणसीला जाणार असून तेथील आपल्या भक्तांना मोदींसाठी मतदानाचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी ते वाराणसीतील साधू, संत, महंतांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shantigiri Maharaj, Narendra Modi
Shivendraraje Bhosale : शेतकऱ्यावर आभाळ कोसळलं; शिवेंद्रराजेंनी दुःखं हलकं केलं...

राजकारण शुद्धीकरण करणार असल्याचा नारा देत शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधून निवडणूक लढवली. येथून महायुतीतील शिंदे गटाचे हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आमने सामने होते. मात्र शांतीगिरी महाराजांच्या एन्ट्रीने ही निवडणूक तिरंगी झाली. शहरातील अवैध धंदे बंद करण्याची महाराजांनी मागणी केली आहे. आता पुण्यातील हिट अॅन्ड रन hit and run case प्रकरणी त्यांनी नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची भेट घेतली आहे. नाशिकमधील ड्रग्जची समस्या हद्दपार करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Shantigiri Maharaj, Narendra Modi
Gajanan Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची 'घरवापसी' ? परब-राऊत धावले मदतीला तर शिरसाटांचे कारवाईचे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com