VK Pandian quit : पराभवानंतर पटनायक यांना मोठा धक्का; उत्तराधिकारी पांडियन यांचा राजकारणातून संन्यास

Naveen Patnaik BJD Leader VK Pandian : व्ही. के. पांडियन हे नवीन पटनायक यांचे उत्तराधिकारी असल्याची चर्चा ओडिशामध्ये रंगली होती. त्याचाच फटका बीजेडीला बसल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Naveen Patnaik, VK Pandian
Naveen Patnaik, VK PandianSarkarnama

Odisha : ओडिशामध्ये बिजू जनता दलाला पराभवाचा धक्का बसल्यानंतर नवीन सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. पण त्याआधीच बीजेडी आणि मावळते मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे राजकीय उत्तराधिकारी अशी चर्चा असलेले व्ही. के. पांडियान यांनी थेट राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.

व्ही. के पांडियन यांचा एक व्हिडीओ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान व्हायरल झाला होता. प्रचारसभेत पटनायक यांच्या प्रकृतीविषयी त्यांच्याकडून लपवाछपवी सुरू असल्याची चर्चा होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जाहीर विधान केले होते. पांडियन हे पटनायक यांचे राजकीय उत्तराधिकारी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा राज्यात रंगली होती.

बीजेडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पटनायक यांना पहिला धक्का बसला आहे. पांडियन यांनी राजकारणाला रामराम ठोकला असून याबाबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी एका छोट्या खेड्यातील कुटुंबातून आलो आहे. लोकांच्या सेवेसाठी आयएएस अधिकारी बनण्याचे माझे स्वप्न होते. ओडिशामध्ये पाऊल ठेवल्यापासून मी लोकांसाठी खूप काम करण्याचा प्रयत्न केला.

बारा वर्षांपुर्वी मी मुख्यमंत्री कार्यालयात आल्याचे सांगत पांडियन म्हणाले, नवीन पटनायक यांच्यासाठी काम करणे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. त्यांच्याकडून मिळालेला अनुभव आयुष्यभरासाठी पुरणारा आहे. ओडिशातील लोकांविषयी त्यांना असलेले प्रेम मला नेहमीच प्रेरित करत राहिले. त्यांचे व्हिजन राबविण्याची अपेक्षा माझ्याकडून होती.

Naveen Patnaik, VK Pandian
Narendra Modi Oath Ceremony Live Update : मोदींच्या टीममध्ये ‘हे’ असतील मंत्री; वाचा पक्षनिहाय संपूर्ण यादी

पटनायक यांच्या मदतीसाठी मी आयएएसचा राजीनामा देऊन बिजू जनता दलामध्ये प्रवेश केला. पण माझ्याविषयी चुकीचे राजकीय मतं मांडण्यात आली. ही मतं मी त्या-त्या वेळी खोडून काढू शकलो नाही. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे मी उमेदवारही नव्हतो आणि पक्षात कोणते पदही नाही. नवीनबाबूंना मदत करणे, हा एकमेव उद्देश होता. पण आता मी राजकारणातून संन्यास घेत आहे, असे पांडियन यांनी जाहीर केले.

मला माफ करा

माझ्याविषयी तयार करण्यात आलेल्या मतांमुळे बिजू जनता दलाचे नुकसान झाले असले तर मला माफ करा. या प्रवासात मी कुणाला दुखावले असेल तर मला माफ करा. ओडिशा माझ्या नेहमीच मनाच्या एका कोपऱ्यात राहील, असे भावनिक होत पांडियान यांनी राजकारणाला निरोप दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com