Bjp Vs Congress : काँग्रेसला घेरण्यासाठी भाजपची मोठी व्यूहरचना; गांधींच्या 'त्या' आरोपांचा मुद्दा लोकसभेत गाजणार

Modi Government : राहुल गांधी यांनी लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha News : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अदानींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे नाव घेत अनेक आरोप केले होते .त्यांच्या भाषणावर सत्ताधारी पक्षाकडूनही अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाचा मुद्दा लोकसभेत वादळी ठरण्याची शक्यता आहे.

भाजपकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर हा हक्कभंग समितीकडे पाठवला जाणार आहे. लोकसभेत कॉंग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष मिळण्याची शक्यता आहे. कायदामंत्री किरण रिजिजू, खासदार निशिकांत दुबे, माजी मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कोणतीही नोटीस न देता आणि पुरावे न देता निराधार आरोप केले असा आक्षेप घेतला आहे. राहुल गांधींच्या भाषणाचा संदर्भ देत लोकसभेच्या नियम 353 आणि 369 चे उल्लंघन झालं आहे असं भाजपचं म्हणणं आहे.

Rahul Gandhi
Ajit Pawar : विधानपरिषदेत धडा शिकवला, आता जागा दाखवून देऊ; अजित पवारांचा इशारा!

भाजपचे खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dube) यांनी आज राहुल गांधींविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केला. बिर्ला यांनी यावर अध्ययनाअंती कार्यवाही होईल असे सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींविरोधातील हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पिठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी हा विषय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.

Rahul Gandhi
Chinchwad By Election: 'कसबा पॅटर्न' चिंचवडमध्येही यशस्वी होणार? कलाटे माघार घेणार की उमेदवारीवर ठाम राहणार?

राहुल गांधींचा नेमका आरोप काय?

राहुल गांधी यांनी लोकसभेत आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकार(Modi Government)वर टीकेची झोड उठवली होती. गांधी म्हणाले, आज सगळीकडे अदानींचे नाव आहे. रस्ता कोणी बांधला तर अदानींचे नाव समोर येईल. हिमाचलमधील सफरचंदावरदेखील अदानींचे नाव असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत, हे देशाला जाणून घ्यायचे असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचे जुने फोटो सभागृहात झळकावले. त्यावरून सत्ताधारी भाजपने सभागृहात जोरदार गोंधळ घातला. अदानी हे 2014 मध्ये सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 609 क्रमांकावर होते. त्यानंतर 9 वर्षात थेट दुसऱ्या क्रमांकावर पोहचले. ही जादू मोदीजी दिल्लीत आल्यानंतर सुरू झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले होते की, "एकत्र येणं म्हणजे सुरुवात, एकोप्यानं राहणं म्हणजे प्रगती आणि एकत्र काम करणं म्हणजे प्रगती, अदानीजी आणि नरेंद्र मोदीजी, धन्यवाद." त्यांच्या भाषणाचा हा भाग सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com